शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

बंदला संमिश्र प्रतिसाद; ११३९ शाळा राहिल्या बंद

By admin | Published: December 10, 2015 1:14 AM

प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन : विद्यार्थांना सुटी; विभागांतील १९९६ शाळांचा सहभाग

कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसह अशैक्षणिक धोरणांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे पुकारण्यात आलेल्या ‘शाळा बंद’ आंदोलनामुळे बुधवारी विद्यार्थ्यांना सुटी मिळाली. बहुतांश संस्थांनी पूर्वनियोजनानुसार आपल्या माध्यमिक, प्राथमिक खासगी व कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवली. मात्र, जिल्हा परिषदेच्या आणि सीबीएसई, आयसीएससी या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा सुरू होत्या. जिल्ह्यातील एकूण प्राथमिक व माध्यमिक ३०४७ शाळांपैकी ११३९ शाळा बंदमध्ये सहभागी झाल्या.शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अहवाल त्वरित मान्य करा. वेतनेतर अनुदान सर्व माध्यमिक शाळांना पूर्वीप्रमाणेच द्या. अनुदानास पात्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग तुकड्यांना त्वरित अनुदान द्या. २८ आॅगस्ट २०१५ च्या संचमान्यतेचा शासननिर्णय रद्द करा, अशा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थाचालकांच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. त्यासह शासनाच्या अशैक्षणिक धोरणांचा राज्यातील शिक्षणक्षेत्राला त्रास होत आहे. या अशैक्षणिक धोरणांना विरोध आणि प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समिती व व्यासपीठाने ‘घंटा नाद आंदोलन’, ‘झोप मोड आंदोलन व मोर्चा’ अशी आंदोलने केली.मात्र, त्याचा सरकारवर काहीच परिणाम झाला आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढवून प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे बुधवारी आणि गुरुवारी (दि. १०) ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. व्यासपीठाने दिलेल्या बंदच्या हाकेला शाळांनी साथ दिली. त्यानुसार जिल्ह्यातील १३९ खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवल्याने या शाळा, महाविद्यालयांतील सुमारे १५ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुटी मिळाली. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये शुकशुकाट पसरला होता. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न वेगळे असल्याने त्या शाळा सुरू होत्या. त्यामुळे संबंधित शाळा नेहमीप्रमाणे सुरू होत्या. दरम्यान, बंदबाबत शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड म्हणाले, सीबीएसई, आयसीएसई आणि जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या शाळावगळता अन्य शाळा बंदमध्ये सहभागी झाल्या. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. गुरुवारी बंद पाळला जाणार आहे. शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी म्हणाले, कोल्हापूर विभागात प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण १४४२७ शाळा असून त्यापैकी १९९६ शाळा बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी) कोल्हापूर विभागातील बंदमधील सहभागी शाळा अशाजिल्हाप्राथमिकमाध्यमिककोल्हापूर२२४९१५सांगली३८ ३२५सातारा -२७५रत्नागिरी-२सिंधुदुर्ग१ २१६इचलकरंजीतील४९ शाळा सहभागीइचलकरंजी : विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपामध्ये शहरातील ४९ शाळांनी सहभाग नोंदविला. या शाळा आज, गुरुवारीसुद्धा संपामध्ये सहभागी होणार आहेत. राज्यातील माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांच्या शासनाकडे विविध मागण्या आहेत.बुधवारी व आज संपाचे आंदोलन केले आहे. त्यामध्ये इचलकरंजीतील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या ४९ शाळांनी सहभाग नोंदविला.