जीएसटीमधील जाचक अटी आणि बदलणारे नियम यामुळे देशातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (दि.२६) देशव्यापी बंद पुकारला. बंदच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.
गडहिंग्लज चेंबर्स ऑफ कॉमर्सने बंदला पाठिंबा दिला. परंतु, सकाळी १० ते १२ या काळात आपले व्यवहार बंद ठेवले. कांही दुकाने सकाळी सुरू होती, तर काहींनी दुपारी १२ नंतर व्यवहार सुरू केले, तर काही व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली.
दरम्यान, गडहिंग्लजमधील व्यापारी संघटनांनी प्रांतकचेरीचे नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांना जीएसटीमधील अन्यायी अटी रद्द करण्याबाबत निवेदन दिले.
शिष्टमंडळात राजेश बोरगावे, सुनील चौगुले, रामदास कुराडे, प्रकाश मोरे, भैरू गंधवाले, श्रीनिवास वेर्णेकर यांच्यासह विविध व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
-----------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथे ‘जीएसटी’मधील जाचक अटीविरोधी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे गडहिंग्लज-संकेश्वर या मुख्य रस्त्यावर असा शुकशुकाट होता.
क्रमांक : २६०२२०२१-गड-०६