शिरोळ /उदगाव : कोल्हापूर जिल्ह्यात काल, शुक्रवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला. यापावसामुळे सर्वच पाणीच पाणी झाले होते. शिरोळ तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. तब्बल तीन तास विजेच्या कडकड्यासह पाऊस झाल्याने सर्वत्र दैना उडाली आहे. उदगाव (ता. शिरोळ) येथे सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावर ओढ्याचे पाणी आल्याने महामार्ग बंद झाला आहे. तर शिरोळमधील महात्मे मळा येथे वीस ते पंचवीस घरामध्ये पाणी शिरले. जयसिंगपूर येथेही काही घरात पाणी शिरले.त्याचबरोबर उदगाव-रेल्वे स्टेशन चिंचवाड-शिरोळ, उदगाव-उमळवाड यासह तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहे. तीन तासात ११८ मिलिमीटर पाऊस पडल्याने शिरोळ, जयसिंगपूर, उदगाव, चिंचवाड सह तालुक्यातील अनेक परिसरात शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पीके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपालासह ऊस पिकाचे नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस, उदगांव येथे सांगली-कोल्हापूर महामार्गावर पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 11:31 AM