शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

CM Uddhav Thackeray : "यांनी वाढवत जायचे आणि आम्ही कमी करायचे का?"; पेट्रोल डिझेलवरून मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 5:32 PM

CM Uddhav Thackeray : "आमच्या जीएसटीचीही रक्कम देत नाहीत. राज्याच्या विकासासाठी आम्ही ही आघाडी केली"- उद्धव ठाकरे

"देवेंद्र फडणवीस म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांना रेशन दिलं. रेशन दिलं, पण ते शिजवायचं की कच्चं खायचं. गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आदिवासी क्षेत्रात गेलं तर त्यांचंही तेच म्हणणं आहे, पहिलं सिलिंडर मिळालं, पण दुसरं भरताना कशी तारांबळ उडतेच ते कोण पाहायला आलं. पहिलं सिलिंडर दिलं आता काय कोरोना पळवायला रिकामं सिलिंडर वाजवायचा का?," असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. कोल्हापूरात जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेला मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केलं. "रेशन दिलं ते जनतेच्या पैशातूनच दिलं, तुमच्या पैशातून नाही. विक्रांतच्या पैशातून तुमचं रेशन भरलं आणि दिलेलं रेशन शिजवायचं कसं हे सांगत नाही. कालच्या भाषणात महागाईबद्दल कोणी बोललं का. भाजपशासित राज्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी केले या सरकारनं पण केले असते तर पेट्रोल स्वस्त मिळालं असतं असं म्हणाले. आम्ही कमी करायचे तुम्ही वाढवात जायचे. आमच्या जीएसटीचीही रक्कम देत नाहीत. राज्याच्या विकासासाठी आम्ही ही आघाडी केली," असंही ठाकरे म्हणाले.

"२०१४ ला युती आम्ही नव्हती तोडली""आज आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणतात, तुमचा भगवा खरा आमचा खोटा, पाठीमागे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आहेत, दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. २०१४ ला युती आम्ही नव्हती तोडली. शेवटचा दिवस असताना मला एकनाथ खडसेंचा फोन आला. आपलं काही जुळेल असं वाटत नाही, वेगवेगळं लढलेलं बरं असं ते म्हणाले. जागावाटप होत आलेलं पण अचानक असं काय घडलं? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. त्यावेळीही आमच्या हाती भगवा होता. तुम्ही युती तोडली आणि स्वतंत्र लढलो. शिवसेना ही समोरुन वार करतो, पाठून वार करत नसल्याचंही ते म्हणाले. 

"देशात भाजपनंही बनावट हिदुहृदयसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न केला""देशात भाजपनंही बनावट हिदुहृदयसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फसला, लोकांनी तो झिडकारला. हिदुहृदयसम्राट म्हटल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि चेहरा समोर येतो. हिंदुहृदयसम्राट म्हणजे हिंदू अडचणीत असताना कसलीही पर्वा न करता मदतीला धावून येणारा तोच हिंदुहृदयसम्राट ठरू शकतो. त्यावेळी घरी बसून नंतर तुम्ही येणार आणि लोकांना प्रतिक्रिया देणार हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात. हिंदुहृदयासम्राटांबाबत इतकंच प्रेम आहे, तर मध्यंतरी त्यांच्या नावासमोर जनाब लावण्याचं कामही करण्यात आलं. त्यांच्या खोलीत अमित शाहंनी दिलेलं वचन का मोडलं याचं उत्तर का नाही देत. इतकंच प्रेम आहे तर नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायला विरोध का?," असा प्रश्नही त्यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकPetrolपेट्रोलDieselडिझेल