कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद ज्येष्ठ प्रमुख सहायक कॅमेरामन किसन उर्फ कृष्णात धोंडीराम पोवार (वय ६३) यांचे रविवारी रात्री ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
पोवार यांनी १९७८ साली विष्णूपंत चव्हाण यांच्या साउंड ट्रॅकवर लाईटमन विभागात कामाची सुरुवात केली होती. ज्येष्ठ कॅमेरामन कोया यमकर यांनी त्यांना प्रमुख सहायक कॅमेरामन म्हणून प्रथम संधी दिली. पुढे ज्येष्ठ दिग्गज कॅमेरामन शरद चव्हाण, वसंतराव शिंदे, प्रकाश शिंदे, हिरालाल अत्तार, चारुदत्त दुखंडे, सुरेश देशमाने, विजय देशमुख इत्यादी यांच्याकडे कॅमेरामनचे प्रमुख सहायक कॅमेरामन म्हणून काम केले. त्यांनी १०० हून अधिक मराठी चित्रपटांचे प्रमुख सहायक कॅमेरामन म्हणून काम केले होते. उत्कृष्ट चित्रीकरण सेट लाईटिंग करण्यामध्ये निष्णात अनुभव असल्याने सर्वच कॅमेरामन त्यांचा नावाचा आवर्जून आग्रह धरत होते. त्यांना २०१७ मध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मानाचा चित्रकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
--
फोटो नं १२०७२०२१-कोल-कृष्णात पोवार (निधन)
--