शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

सहकाराच्या निवडणुका दोन महिने ढकलल्या पुढे

By admin | Published: February 10, 2017 12:17 AM

सहकाराच्या निवडणुका दोन महिने ढकलल्या पुढे

दत्ता बिडकर --हातकणंगले छातीवर संघटनेचा बिल्ला लावून शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना डावलून तालुक्यातील कुंभोज, रूकडी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी संघटनेने इतर पक्षातून आयात झालेल्या ‘आयारामां’ना संधी दिल्यामुळे शेतकरी संघटनेच्या निष्ठावंतांमध्ये खदखद सुरू आहे.तालुक्यातील ११ जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घुणकी, भोदोले, कुंभोज, रूकडी, कोरोची आणि पट्टणकोडोली अशा सहा जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी घुणकी, भोदोले आणि पट्टणकोडोली या ठिकाणी संघटनेच्या अांदोलनामध्ये सहभागी असलेल्या निष्ठावंत संघटनेच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली असली तरी भोदोले जिल्हा परिषदेची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी मागे घेऊन त्या बदल्यात काँग्रेस पक्षाबरोबर समझोता करून भोदोले पंचायत समितीची जागा पदरात पाडून घेण्यासाठी स्वाभिमानीची धडपड सुरू आहे. तशीच स्थिती पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात सुरू आहे. पट्टणकोडोली जिल्हा परिषद स्वाभिमानीची उमेदवारी मागे घेऊन या मतदारसंघात स्वाभिमानी शिवसेना आणि प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडीला पाठिंबा देऊन त्या बदल्यात रूई पंचायत समितीची जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीचे सहयोगी पंचायत समिती सदस्य संतोष शिंदे-माळी या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केलेल्या उमेदवारास संधी दिली आहे, तर याच जिल्हा परिषद मतदारसंघातील लाटवडे पंचायत समितीमध्ये काँग्रेसमधून आलेल्या अशोक माळी यांना संधी दिली आहे. रूकडी जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानीने हातकणंगले पंचायत समितीचे काँग्रेस पक्षाचे सभापती आणि महादेवराव महाडिक याचे कट्टर समर्थक राजेश पाटील यांच्या पत्नी पदमाराणी पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर रूकडी पंचायत समितीमध्ये स्वाभिमानीने शिवसेनेला साथ दिली आहे.कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानीने राष्ट्रवादीचे यशवंत ऊर्फ भाऊ वाणी या आयारामाना संधी दिली आहे. या मतदारसंघात स्वाभिमानीने शिवसेनेसोबत घरोबा केला आहे. कोरोची जिल्हा परिषद स्वाभिमानीला आणि कोरोची व तारदाळ पंचायत समिती सेनेला यामुळे भाजप आणि आवाडे गटाबरोबर स्वाभिमानीची युती फिस्कटल्याने या मतदारसंघात चुरस वाढली आहे.तालुक्यातील शिरोली आणि रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपबरोबर आहे, तर हुपरी जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना आवाडे ग्रुपच्या ताराराणी आघाडी सोबत आहे. कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघात आवाडे, पी. एम. पाटील, सुधाकर मणेरे, मदन कारंडे, जयकुमार कोले यांच्या स्थानिक पातळीवर झालेल्या आघाडीला स्वाभिमानीचा पाठिंबा असूनही आघाडी थेट भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांच्याविरुद्ध लढणार आहे.तालुक्यात : सर्वच पक्षांबरोबर आघाड्यातालुक्यात हातकणंगले आणि भादोले जिल्हा परिषदेमध्ये स्वाभिमानी जयवंतराव आवळे यांच्या काँग्रेसबरोबर. शिरोली आणि रेंदाळमध्ये स्वाभिमानी भाजपसोबत, तर हुपरी जिल्हा परिषदमध्ये स्वाभिमानी आवाडे गु्रपच्या ताराराणीबरोबर राहणार आहे. तारदाळ, रूकडी आणि पट्टणकोडोलीमध्ये स्वाभिमानी शिवसेनेसोबत असून स्वाभिमानी हा एकमेव पक्ष तालुक्यामध्ये सर्वांच्या बरोबर आघाड्या आणि युती करून काही ना काही पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत आहे.