कोल्हापूर : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातर्फे मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर स्थगित करून ३१ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सहकार विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी बुधवारी यासंबंधीचा आदेश काढला आहे.राज्यातील ३१ डिसेंबर २०२३ अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या ९३ हजार ३४२ सहकारी संस्थांपैकी ५० हजार २३८ सहकारी संस्थांची निवडणूक पूर्ण झाली आहे. १० हजार ७८३ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया चालू आहेत. २० हजार १३० सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहेत. यावर्षी सात हजार ८२७ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. यामध्ये सहकार विभागातील अधिकारी, कर्मचारी सक्रिय झाले आहेत. याशिवाय जिल्हा, तालुका स्तरावर अधिकारी, कर्मचारी रिक्त आहेत. यामुळे राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.
सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मेपर्यंत लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 11:24 AM