कोल्हापूर : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर सोमवारी ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात परखड भाषेत शहराच्या या गंभीर समस्येवर प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याचे पडसाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. गेल्या तीन वर्षापासून झुमवरील कचरा तुम्हाला उचलणे शक्य झाले नाही आणि थ्री स्टार रॅँकींगसाठी शासनाकडे प्रस्ताव कसला पाठविता असा खडा सवाल माधुरी लाड यांनी अधिकाऱ्यांना विचारला. तर आरोग्य विभागाचा कारभार हा ‘कासवछाप नाही तर गोगलगाय छाप’ असल्याची टीका उपमहापौर महेश सावंत यांनी केली.
कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्र थ्री स्टार रॅँकींग प्रमाणित म्हणून घोषित करण्यास मान्यता व्हावी म्हणून महासभेसमोर प्रशासनाने प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावाची माधुरी लाड, महेश सावंत, अजित ठाणेकर, विजय खाडे-पाटील, दिलीप पोवार यांनी अक्षरश: टर्र उडविली. तुम्हाला झुमवरील कचरा गेल्या तीन वर्षात हलविता आलेला नाही. आजूबाजूच्या नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. श्वसनाचे विकार जडले आहेत. नागरीकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. अधिकारी कोणतही जबाबदारी घेत नाहीत अशी टीका लाड यांनी केली. इनअर्ट मटेरिल हलविण्याचे काम तुम्हाला का जमलेले नाही अशी विचारणा दिलीप पोवार यांनी केली. आरोग्य विभागाचा कारभार हा कासवछाप नाही तर गोगलगाय असल्याची खरमरीत टीका महेश सावंत यांनी केली.
नागरीकांना कचºयाचे वर्गीकरण करण्याचे आवाहन करता, नागरीकही त्याची अंमलबजावणी करत आहेत. पण तुम्ही सगळा कचरा झुमवर एकत्रच टाकता असला तुमचा कारभार असल्याचे सांगत लाड यांनी अधिकाºयांचे वाभाडे काढले. घरातून कचरा उचलणे आणि त्याची निर्गत करण्याचे काम होत नसताना खोटा अहवाल राज्य शासनाला पाठवू नका, अशा शब्दात अजित ठाणेकर यांनी अधिकाºयांना ठणकावले. नागरीकांना त्यांची जबाबदारी सांगता पण तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडत नाही म्हणूनच कचºयाचा प्रश्न गंभीर बनसल्याचे ठाणेकर म्हणाले.
यावर खुलासा करताना मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी येत्या काही दिवसात उर्जा निर्मितीचा प्रकल्प सुरु झाला की तेथील खरमाती टाकाळा येथील खणीत नेऊन टाकण्यात येणार आहे. उर्जा निर्मितीची सर्व मशिनरी जागेवर आहे. ठेकेदार लवकरच तो प्रकल्प सुरु करेल, असे सांगितले. १०४ टेंपो रिक्षा महापालिका खरेदी करणार असून कचरा उठावाचे काम शंभर टक्के होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्लॅस्टीकची विक्रीही राजरोस होत असल्याची बाब विजय खाडे यांनी निदर्शनास आणून दिली.माधुरी लाड यांनी ‘लोकमत’चा अंक दाखविलामाधुरी लाड या कसबा बावडा -लाईन बाजार प्रभागातून निवडून आल्या आहेत. गेल्या तीन वर्षापासून त्या झुम वरील कचºयाबाबत तक्रार करत आहेत. त्यांच्या तक्रारीकडे अधिकाºयांनी फारसे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. सोमवारी त्याच्या प्रश्नाला वाचा फोडल्यामुळे त्या चक्क ‘लोकमत’च सभागृहात घेऊन आल्या होत्या. त्यांनी हा अंक सर्वांना दाखवत अधिकाºयांनी गांभीर्याने यात लक्ष घालून लोकांना समस्यामुक्त करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.