शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

कोयना जलविद्युतचे पाणी दुष्काळी भागात वळवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:49 AM

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोयना जलविद्युत प्रकल्प व टाटा जलविद्युत प्रकल्प समूहातून वीज निर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातून विपुलतेच्या खोºयात म्हणजेच कोकणात वळविण्यात येणारे पाणी टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा शासन गांभीर्याने विचार करत आहे. हे पाणी पूर्वेकडील कृष्णा आणि भीमा खोºयातील दुष्काळी भागाकडे वळविण्यात येणार आहे.यासाठी उच्चस्तरीय अभ्यासगटाची जलसंपदा विभागाने गुरुवारी ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोयना जलविद्युत प्रकल्प व टाटा जलविद्युत प्रकल्प समूहातून वीज निर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातून विपुलतेच्या खोºयात म्हणजेच कोकणात वळविण्यात येणारे पाणी टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा शासन गांभीर्याने विचार करत आहे. हे पाणी पूर्वेकडील कृष्णा आणि भीमा खोºयातील दुष्काळी भागाकडे वळविण्यात येणार आहे.यासाठी उच्चस्तरीय अभ्यासगटाची जलसंपदा विभागाने गुरुवारी नियुक्ती केली. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अ. पां. भावे या अभ्यासगटाचे अध्यक्ष आहेत. या अभ्यासगटाने तीन महिन्यांत अहवाल द्यायचा आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाद्वारे ६७.५ अघफू व टाटा जलविद्युत प्रकल्पाद्वारे सरासरी ४२.५० अब्ज घनफूट (अघफू) कृष्णा खोºयातील अनुक्रमे ऊर्ध्व कृष्णा व ऊर्ध्व भीमा या उपखोºयातील पाणी विद्युत निर्मिती करून पश्चिमेकडे कोकणात वळविण्यात येते. कृष्णा पाणी तंटा लवादाने प्रति जलवर्षाकरिता खोºयाबाहेर पाणी वळविण्यासाठी सरासरी व महत्तम मर्यादा ठरवून दिली आहे. राज्य जलनीतीनुसार पिण्याचे पाणी व सिंचनाबाबत पाणी वापराचा प्राधान्यक्रम जलविद्युतच्या वर आहे. शिवाय अन्य विविध पर्यायांद्वारे वीज उपलब्ध करणे शक्य असल्याने कृष्णा खोºयातील पाण्याची वाढती मागणी विचारात घेता कोकणाकडे वळविलेल्या पाण्याबाबत फेरअभ्यास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.विशेषत : टाटा जलविद्युत प्रकल्पातून वळविण्यात येणारे पाणी भीमा या तुटीच्या खोºयातील असून या खोºयातील बहुतांशी भाग अवर्षणग्रस्त आहे. वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकीकरणामुळे, पिण्याच्या व औद्योगिक वापरासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी आहे. सिंचनासाठीही या प्रदेशात पाण्याची गरज आहे.असा आहे अभ्यासगटजलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अ. पां. भावे हे या अभ्यासगटाचे अध्यक्ष असतील. सदस्यांमध्ये जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्रीकांत हुद्दार, निवृत्त सहसंचालक दि.मा.मोरे, जलविद्युत प्रकल्प व गुणनियंत्रण पुणेचे मुख्य अभियंता, पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, कोकण प्रदेशचे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांनी नियुक्त केलेला महाजनकोचा प्रतिनिधी, टाटा पॉवर कंपनीने नियुक्त केलेला प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या गटाचे सदस्य सचिव म्हणून पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता हे काम पाहतील.अभ्यास गटाची कार्यकक्षा१) टाटा जलविद्युत प्रकल्पासाठी गेल्या ९० वर्षापासून मुळशी व इतर धरणांतून भीमा उपखोºयातील दरवर्षी अंदाजे ४२.५० टीएमएसी पाणी पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी वळविण्यात येते.२) ऊर्ध्व भीमा हे तुटीचे उपखोरे असून बहुतांश भाग दुष्काळग्रस्त आहे. टाटा प्रकल्पासाठी वीज निर्मितीसाठी वळविण्यात येणारे पाणी कमी करून पूर्वेकडे मूळ ऊर्ध्व भीमा उपखोºयातच वळविण्याकरिता वर्षनिहाय टप्पे ठरविण्यात येणार आहेत.३) वीजनिर्मितीचे पाणी कमी करताना वीजनिर्मितीसाठी सध्याची निर्माण केलेली व्यवस्था जास्तीत जास्त कार्यक्षमतेने उपयोगात आणण्यासाठी काय बदल करावे लागतील याबाबत उपाययोजना सूचविणे४) या जलविद्युत प्रकल्पातील पाणी कोकणांत सिंचन, पिण्यासाठी व औद्योगिकरणासाठी वापरले जाते. हे पाणी कमी केल्यावर त्या प्रदेशात अडचण होऊ नये यासाठी उपाययोजना सुचविणे.५) या निर्णयामुळे काही कायदेशीर बाबी निर्माण होऊ शकतात का याविषयीचा अभ्यास करणे.