शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कोल्हापुरात कोकेनचा पुरवठा करणाऱ्यास मुंबईतून अटक, मूळचा पाचगावचा; मोठी साखळी कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 4:47 PM

शेअर ट्रेडिंग करणाऱ्याकडून कोकेनची तस्करी

कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नागाळा पार्क येथे सापळा रचून पकडलेला कोकेन विक्रेता नीलेश राजेंद्र जाधव (वय ४०, रा. बुधवार पेठ, कोल्हापूर) याने मुंबईतून कोकेन आणल्याचे तपासात स्पष्ट झाले. कोकेनचा पुरवठादार विशाल विलास तांबडे (वय ५०, सध्या रा. मुंबई, मूळ रा. पाचगाव, ता. करवीर) याला पोलिसांनी रविवारी (दि. १३) मुंबईतून अटक केली. या तस्करीतील मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.पोलिसांनी गुरुवारी (दि. १०) नागाळा पार्क येथून नीलेश जाधव याला अटक करून त्याच्याकडील १३३ ग्रॅम कोकेन अमली पदार्थ जप्त केले होते. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. अधिक चौकशी केली असता, त्याने मुंबईतून कोकेन आणल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने मुंबईत ग्रँट रोड येथे जाऊन कोकेन पुरवठादार विलास तांबडे याला अटक केली. तो मूळचा पाचगाव येथील रायगड कॉलनीत राहणारा आहे.शेअर मार्केट ट्रेडिंगचा व्यवसाय करणारा तांबडे हा गेल्या काही वर्षांपासून मुंबईत राहतो. न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत (दि. १४) पोलिस कोठडी मिळाली. तांबडे याने कोकेन कोणाकडून आणले, याचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.अमली पदार्थांचा लाखोंचा बाजारगांजा आणि चरस विकणाऱ्यांना पोलिसांना अनेकदा अटक करून त्यांच्याकडील लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, अलीकडच्या काळात कोकेन विक्रेत्याला पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावरून कोकेनची विक्री कोल्हापुरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडील १३३ ग्रॅम कोकेनची किंमत २० लाख रुपये आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस