शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नारळ फुटले; प्रचाराला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:30 AM

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : अर्ज माघारीनंतर शिरोळ तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गावांतील वातावरण तापू लागले आहे. नशीब आजमावण्यासाठी तसेच सरपंच, सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या प्रचाराचा नारळ फुटला असून, भेटीगाठींना वेग आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी फटाके फोडण्यासाठी उमेदवार ...

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : अर्ज माघारीनंतर शिरोळ तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गावांतील वातावरण तापू लागले आहे. नशीब आजमावण्यासाठी तसेच सरपंच, सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या प्रचाराचा नारळ फुटला असून, भेटीगाठींना वेग आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी फटाके फोडण्यासाठी उमेदवार सज्ज झाले आहेत.तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर चिंचवाड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. सर्वच गट-तट व पक्ष एकत्र आल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. १४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाकरिता ४९, तर सदस्य पदाकरिता ३९५ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहेत. सुरुवातीला पक्षीय पातळीवर निवडणूक लढणार म्हणणाºया नेत्यांनी आपली तलवार म्यान करून आघाड्यांना महत्त्व दिले आहे. कार्यकर्त्यांच्या हट्टापोटी नेत्यांनी सोयीच्या आघाड्या केल्या आहेत.दरम्यान, अर्ज मागे घेतल्यामुळे खरे उमेदवार स्पष्ट झाले आहेत. अनेक गावात सध्या प्रचाराचा नारळ फुटल्याने प्रचाराला वेग येत आहे. प्रचारासाठी सकाळी दुचाकी रॅली काढली जाते. हालगीचा वापर प्रचारासाठी केला जात आहे. यामुळे वाजविणाºयांनाही सुगीचे दिवस आले आहेत. ज्या उमेदवारांच्या सौभाग्यवती सरपंच, ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचे पतिराज दारोदारी, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. रात्रीच्या वेळी कॉर्नर बैठका घेतल्या जात आहेत. यामध्ये विकासाच्या आश्वासनाचा पाऊस पॅनेलप्रमुखांकडून पाडला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. नेतेमंडळी मताची वजाबाकी व स्थानिक समीकरणांना महत्त्व देत आहेत.सरपंचपदाला महत्त्वंंलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिरोळ तालुक्यात भाजपला तीन, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व स्वाभिमानीला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. १४ ग्रामपंचायतींपैकी शिवनाकवाडी, हरोली, टाकवडे, कवठेसार, उमळवाड, कनवाड, अकिवाट व नवे दानवाड याठिकाणी भाजपचा उमेदवार सरपंचपदाची निवडणूक लढवित आहे. थेट सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने ग्रामपंचायतीत सरपंचांना महत्त्व आले आहे.नेत्यांचे संभाजीपूर टार्गेटसंभाजीपूर ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार आहे. काँग्रेस-स्वाभिमानी-ज्येष्ठ नागरिक आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे. भाजपनेही उमेदवार दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जयसिंगपूर शहराजवळ असलेल्या संभाजीपूर ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी नेत्यांनी ही निवडणूक टार्गेट केली आहे. यामुळे खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अनिल यादव या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.