शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

‘सावित्रीबाई’मध्ये शवपेटीची सुविधा, आणखी तीन शवपेट्या घेणार : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 5:37 PM

महानगरपालिका प्रशासनाने सावित्रीबाई फुले रुग्णालयात शीत शवपेटीची सुविधा उपलब्ध करून दिली असून तिचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व महापौर माधवी गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाले. अशा प्रकारच्या अजून तीन शीत शवपेट्या घेतल्या जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्दे‘सावित्रीबाई’मध्ये शवपेटीची सुविधाआणखी तीन शवपेट्या घेणार : देशमुख

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने सावित्रीबाई फुले रुग्णालयात शीत शवपेटीची सुविधा उपलब्ध करून दिली असून तिचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व महापौर माधवी गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाले. अशा प्रकारच्या अजून तीन शीत शवपेट्या घेतल्या जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी गुरुवारी दिली.एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मृत झाली आणि काही कारणाने एक-दोन दिवस मृतदेह ठेवायचा प्रसंग आला तर नातेवाइकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने चार शीत शवपेट्या घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांतील एक शीत शवपेटी गुरुवारी सावित्रीबाई फुले रुग्णालयात बसविण्यात आली.सावित्रीबाई फुले रुग्णालयासह आयसोलेशन हॉस्पिटल व पंचगंगा रुग्णालय येथे अशा प्रकारची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. या शीत शवपेटीत शून्य ते पाच अंश इतक्या कमी तापमानात मृतदेह किमान दोन दिवस ठेवला जाऊ शकतो. सध्या डी. वाय. पाटील व प्रमिलाराजे रुग्णालय येथेच अशा प्रकारच्या शवागाराची सोय आहे. आणखी एका खासगी रुग्णालयात अशी सोय आहे; परंतु या यंत्रणेवर अधिक भार पडतो, तेव्हा मृतदेह कोठे ठेवायचा, असा प्रश्न नातेवाइकांना सतावत असायचा. महापालिकेकडून ही गैरसोय दूर करण्याकरिता चार शीत शवपेट्या घेण्यात येणार आहेत.अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारी राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकेतील कोल्हापूर महानगरपालिका ही पहिलीच आहे. अन्य कोणत्या महापालिकेत अशी सोय नाही. उद्घाटनप्रसंगी उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समितीचे सभापती देशमुख, नगरसेविका दीपा मगदूम, प्रतीक्षा पाटील, माधुरी लाड, प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक सचिन पाटील, संजय मोहिते, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, विनायक फाळके, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, डॉ. प्रकाश पावरा उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर