शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
2
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
3
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
4
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
5
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
6
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
7
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
8
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
9
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
10
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
11
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
12
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
13
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...
14
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
15
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
16
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
17
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
18
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
19
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

करवीरच्या तहसीलदारपदी शीतल मुळे-भामरे: पुणे विभागातील १८ तहसीलदारांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 16:24 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील १८ तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील नऊ जणांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे करवीरच्या तहसीलदारपदी शीतल मुळे-भामरे: पुणे विभागातील १८ तहसीलदारांच्या बदल्याअपर्णा मोरे शिरोळला दिनेश पारगे गडहिंग्लजला, शिल्पा ठोकडे कागलला, बी. जे. गोरे कवठेमहंकाळला,

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील १८ तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील नऊ जणांचा समावेश आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांची करवीर तहसीलदारपदी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अपर्णा मोरे यांची शिरोळ तहसीलदारपदी, कागलचे तहसीलदार बी. जे. गोरे यांची कवठेमहांकाळ तहसीलदारपदी, तहसीलदार (संगायो) दिनेश पारगे यांची गडहिंग्लजला तहसीलदारपदी बदली झाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यपालांच्या आदेशानुसार महसूल विभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी पुणे विभागातील १८ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये करवीरचे तहसीलदार सचिन गिरी यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर महसूल तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांची बदली झाली आहे. भामरे यांच्या जागेवर पुणे येथील तहसीलदार (संगायो) सुनीता नेर्लीकर यांची बदली झाली.शिरोळ तहसीलदार गजानन गुरव यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अपर्णा मोरे यांची बदली झाली. कागलचे तहसीलदार बी. जे. गोरे यांची कवठेमहांकाळ (जि. सांगली) तहसीलदारपदी बदली झाली.त्यांच्या जागेवर कवठेमहांकाळ तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची बदली झाली.

शाहूवाडीचे तहसीलदार चंद्रशेखर सानप यांची महसूल तहसीलदार (सांगली जिल्हाधिकारी कार्यालय)पदी, त्यांच्याजागेवर शिरूर (जि.पुणे)चे तहसीलदार गुरू बिराजदार यांची, गडहिंग्लजचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांची महसूल तहसीलदार (सांगली जिल्हाधिकारी कार्यालय)पदी, जिल्हा करमणूक अधिकारी सुषमा पाटील यांची महाबळेश्वर (जि. सातारा)तहसीलदारपदी, हातकणंगले तहसीलदार सुधाकर भोसले यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्याने रिक्त जागेवर आजरा तहसीलदार प्रदीप उबाळे यांची, तहसीलदार (संगायो) दिनेश पारगे यांची गडहिंग्लज तहसीलदारपदी, पुनर्वसन तहसीलदार मैमुनिसा संदे यांची पारगे यांच्या रिक्त जागेवर बदली झाली.

निवडणूक तहसीलदार अरुणा गायकवाड यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर कडेगाव (जि.सांगली)च्या तहसीलदार अर्चना शेटे यांची बदली झाली.कोल्हापूरशी संंबंधित तहसीलदारांच्या बदल्यामावळ (जि.पुणे) येथील तहसीलदार रणजित देसाई यांची मिरज तहसीलदारपदी, सांगलीचे महसूल तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांची सांगोला येथे बदली झाली आहे. देसाई यांनी कोल्हापूर शहर पुरवठा अधिकारी तर खरमाटे यांनी करवीर तहसीलदारपदी काम केले आहे. 

 

टॅग्स :TransferबदलीTahasildarतहसीलदारkolhapurकोल्हापूर