कोल्हापूर - कोल्हापूरमध्ये गेल्या सहा दिवसांपासून पडणाऱ्या कोसळधारा मुळे जिल्ह्यात पाणीच-पाणी झाले आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून ती पात्राबाहेर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 63 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे पावसामुळे पाच राज्यमार्ग आणि 13 जिल्हामार्गावरी वाहतूक अंशत: बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. शहरात सकाळपासून संततधार सुरू असल्याने सखल भागांत पाणी साचून ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप आले होते.
जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील तब्बल 51 बंधारे पाण्याखाली गेले. या पावसाने पंचगंगा नदी दुसयांदा पात्राबाहेर आली आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शहरातील भाजी मंडयाही ठप्प होऊन नागरिकांची गैरसोय झाली. या पावसाने हवेत चांगलाच गारठा निर्माण झाला होता. पंचगंगा नदीचे पाणी दुस-यांदा पात्राबाहेर आले असून ते पाहण्यासाठी नागरिकांनी सायंकाळी गर्दी केली. या पावसाने जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होऊन ती अन्य मार्गांवरून वळविण्यात आली.
कोल्हापूर-रत्नागिरी सीमेवरील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे ती गगनबावडामार्गे वळविण्यात आली.