कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये तीन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा हा ७१ वा रविवार असून, सामाजिक संघटना आणि महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून सहभाग नोंदविला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली.कसबा बावडा झूम प्रकल्प येथे ग्रीन कॉरिडॉर करण्याच्या दृष्टीने विषारी वायू शोषण करणाऱ्या १४ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर, विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, उन्मेष कांबळे, शैलेश कुंभार, अमर कुंभार, शुभम पाटील, शैलेश बचनकार, रोहन लोंढे, शाहू बुचडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.स्वच्छता केलेला परिसरपंचगंगा नदीघाट, पंचगंगा स्मशान, रिलायन्स मॉलची मागील बाजू जयंती नदी, यल्लमा मंदिराचा परिसर, रंकाळा तलाव परिसर, जयंती नदी संप व पंप हाऊस परिसर, हुतात्मा गार्डन, इराणी खण, दसरा चौक ते संप व पंप हाऊस मेन रोड, दसरा चौक ग्राउंड, मिलिटरी मेन रोड.महापालिकेची यंत्रणातीन जेसीबी, तीन डंपर, सहा आरसी गाड्या, तीन औषध फवारणी टँकर, महापालिकेचे ६० स्वच्छता कर्मचारी.
महास्वच्छता अभियानात तीन टन कचरा, प्लास्टिक गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 4:31 PM
कोल्हापूर शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये तीन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा हा ७१ वा रविवार असून, सामाजिक संघटना आणि महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून सहभाग नोंदविला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली.
ठळक मुद्देमहास्वच्छता अभियानात तीन टन कचरा, प्लास्टिक गोळासफाई कर्मचाऱ्यांचा सोशल डिस्टन्स ठेवून सहभाग