दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे कोरोना दक्षता समितीने धडक मोहीम घेऊन दुकानदार तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली. तर अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानदारांनी दुकाने बंद केली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासनाने फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. तर उर्वरित सेवा बंद करून संचारबंदी लागू केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडून जनजागृती केली जात आहे. तरीही काही दुकानदार अत्यावश्यक सेवा नसतानाही दुकाने सुरू ठेवत होते. याबाबत दक्षता समितीने दुकानदारांना वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र, त्या सूचनांकडे कानाडोळा करीत दुकाने सुरू ठेवल्याने सोमवारी सकाळी तलाठी अश्विनी खराडे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत कांबळे, पोलीस पाटील संजय पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांवर कारवाई सुरू केली. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर व विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.
फोटो - १९०४२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - दत्तवाड (ता. शिरोळ) येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर दक्षता समितीने सोमवारी दंडात्मक कारवाई केली.