शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

ट्रॅव्हल्स कंपनीकडून २२ गुन्ह्यांची ‘ई’ चलनद्वारे दंडाची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 6:02 PM

कोल्हापूर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ‘निता टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ या कंपनीच्या आराम बसचा नंबर आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सर्च केला असता, यापूर्वी २१ गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी या कंपनीकडून २२ गुन्ह्यांचा पाच हजार ८०० रुपये दंड भरून घेतला. गुरुवारी (दि. १) दुपारी ताराराणी सिग्नल चौकात ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी शहाजी ट्रॅव्हल्स आरामबसचे चालक नासीर नायकवडी (रा. कºहाड, जि. सातारा) यांच्याकडून २४ गुन्ह्यांचा चार हजार ८०० रुपये दंड भरून घेतला होता.

ठळक मुद्देट्रॅव्हल्स कंपनीकडून २२ गुन्ह्यांची ‘ई’ चलनद्वारे दंडाची वसुलीशहर वाहतूक शाखेची कारवाई : ताराराणी सिग्नल चौकातील प्रकार

कोल्हापूर : शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ‘निता टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ या कंपनीच्या आराम बसचा नंबर आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सर्च केला असता, यापूर्वी २१ गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी या कंपनीकडून २२ गुन्ह्यांचा पाच हजार ८०० रुपये दंड भरून घेतला. गुरुवारी (दि. १) दुपारी ताराराणी सिग्नल चौकात ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी शहाजी ट्रॅव्हल्स आरामबसचे चालक नासीर नायकवडी (रा. कºहाड, जि. सातारा) यांच्याकडून २४ गुन्ह्यांचा चार हजार ८०० रुपये दंड भरून घेतला होता.कोल्हापूर, इचलकरंजी शहरात वाहतूक दंड भरून घेण्यासाठी ‘ई’ चलन मशीनचा वापर पोलिसांकडून केला जात आहे. मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, एकेरी मार्ग असतानाही विरोधी दिशेने वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट अशा नियमबाह्य वाहनधारकांच्या संबंधित दुचाकी, कारचा फोटो वाहतूक पोलीस मशीनद्वारे काढत आहेत. वाहनचालकाने केलेल्या गुन्ह्याचे कलम टाकताच दंडाची रक्कम स्क्रीनवर दिसते.

ही रक्कम वाहनधारकाकडून एटीएम, डेबिट कार्ड वापरून आॅनलाईनद्वारे भरून घेतली जात आहे. एखाद्या व्यक्तीने देशभरात कितीवेळा वाहतुकीच्या नियमांचा भंग केला, याची कुंडली या मशीनमध्ये पाहायला मिळते. अशा प्रकारे १ आॅगस्टला दुपारी ताराराणी सिग्नल चौकात ‘निता टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ची खासगी आराम बस वळसा घेऊन सुसाट सिग्नल तोडून निघाली होती. यावेळी ड्युटीवर असलेल्या हवालदार राजेंद्र कलगुटकर यांनी थांबविले. आराम बसचा नंबर (एम. एच. ४७ वाय ६३२३) मशीनवर सर्च केला असता, आतापर्यंत २१ वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शामराव देवणे यांच्यासमोर एकूण २२ गुन्ह्यांचा कंपनीच्या नावे चालकाकडून दंड वसूल करून घेतला. 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर