कोल्हापूर : सहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ उपक्रमाने आता गावागावांतून चांगलेच बळ मिळू लागले आहे. आपलेच जलस्त्रोत आता सुरक्षित ठेवले पाहिजेत याची जाणीव झालेल्या ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे यंदा २ लाख ४२ हजार १९१ मूर्ती संकलन तर सुमारे ५०० टन निर्माल्य संकलन झाले. २९०८ मूर्तींचे घरीच विर्सजन करण्यात आले.
पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्ह्यातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने २०१५ पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून यावर्षी ही जिल्ह्यातील सर्व गावांनी यामध्ये सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी या उपक्रमामध्ये सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. ग्रामस्थांचा जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घेण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य तसेच तालुक्यातील सर्व सभापती यांना आवाहनपत्र देण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी यासाठी बाराही तालुक्यात मुख्यालयातील विभागप्रमुखांची नेमणूक केली होती. पाणी आणि स्वच्छता विभागाच्यावतीने प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी उपक्रमाचे नियोजन केले.
चौकट
तालुकावार मूर्ती संकलन
आजरा १४,५०२, भुदरगड २१,०९०, च्ंदगड १२,०४७, गडहिंग्लज २१, ५७५, गगनबावडा १,८८५, हातकणंगले २३,७२९, कागल २८,७२८,करवीर ४७,४६०,पन्हाळा २४,४२९, राधानगरी १६,१७३, शाहूवाडी १६,१७३, शिरोळ १३,४५८
चौकट
कोल्हापूर जिल्हा परिषदेने सुरू केलेला हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम आता चांगला रूजला आहे. एखादी भूमिका पटल्यानंतर ग्रामस्थांनी दिलेला हा प्रतिसाद नक्कीच उत्साह वाढवणारा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि अधिकारी, कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.
संजयसिंह चव्हाण
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर
१५०९२०२१ कोल राहूल पाटील
जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी सडोली खालसा येथे काहिलीत मूर्ती विसर्जन केले.
१५०९२०२१ कोल संजयसिंह चव्हाण
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी टोप येथे काहिलीत गणेशमूर्तीचे विसर्जन केले.