कोल्हापूर : येथील निसर्गमित्र संस्थेच्या वतीने उन्हाळ्यामध्ये निसर्गप्रेमींकरिता बिया संकलनाचे आवाहन करण्यात आले होते, या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. संस्थेकडे सध्या विविध प्रकारच्या सुमारे दोन लाख बिया जमा झाल्या आहेत. या जमा झालेल्या सर्व बिया सामाजिक वनीकरणचे कोल्हापूर विभागाचे साहाय्यक वनसंरक्षक राजन देसाई यांच्याकडे निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी सुपूर्द केल्या.यावेळी गारगोटीचे वनपाल आनंदा ठोंबरे, निवृत्त वनपाल डी. जी. करडे, संदीप शिंदे हे उपस्थित होते. या सर्व बिया गारगोटी विभागाच्या मडिलगे येथील नर्सरीमध्ये रोपनिर्मितीकरिता देण्यात आल्या. याप्रसंगी पाटील यांनी लोकसहभाग व सेवाभावी संस्थांमुळे स्थानिक जैवविविधता वाढवण्याकरिता हातभार लागत आहे. भविष्यात अशा उपक्रमांची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन केले.कोल्हापुरातील निसर्गप्रेमींना दिल्या रानभाज्यांच्या बियाजमा केलेल्या बियांमध्ये बेल, बहावा, कुंकूफळ, मोह, सीताअशोक, बकुळ, शिवण, पळस, काटेसावर, जांभूळ, भोकर, करंज, कढीपत्ता, शेवगा, रातांबा, लिंबू, गोकर्ण, फॅशन फ्रुट, फणस, गुंज, इत्यादी वनौषधींच्या बिया तसेच आंबट चुका, राजीगरा, करांदा, वरी, घेवडा, गूळवेल, करंबळ, मायाळ, कांडवेल, इत्यादी रानभाज्यांच्या बियाही संकलित झाल्या होत्या. त्या कोल्हापूर शहरातील अनेक निसर्गप्रेमींना लागवडीकरिता देण्यात आल्या.
लोकसहभागातून दोन लाख बियांचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 6:10 PM
कोल्हापूर येथील निसर्गमित्र संस्थेच्या वतीने उन्हाळ्यामध्ये निसर्गप्रेमींकरिता बिया संकलनाचे आवाहन करण्यात आले होते, या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. संस्थेकडे सध्या विविध प्रकारच्या सुमारे दोन लाख बिया जमा झाल्या आहेत. या जमा झालेल्या सर्व बिया सामाजिक वनीकरणचे कोल्हापूर विभागाचे साहाय्यक वनसंरक्षक राजन देसाई यांच्याकडे निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी सुपूर्द केल्या.
ठळक मुद्देलोकसहभागातून दोन लाख बियांचे संकलनबिया रोपनिर्मितीसाठी सामाजिक वनीकरणाकडे सुपूर्द