शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

मोकाट कुत्री रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न हवेत : उपनगरातही प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:20 AM

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा केवळ कोल्हापूर शहराचा नाही. शहरालगत असलेल्या उपनगरातही तो तितकाच गंभीर आहे. महापालिकेसह शहरालगतच्या ग्रामपंचायती, जिल्ह्यातील नगरपालिका यांनी एकाचवेळी मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम राबविली, तरच त्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसू शकेल.शिरोलीत गेल्या आठवड्यात एकाच दिवशी मोकाट कुत्र्याने २७ जणांचा चावा घेतल्याने शहरालगतच्या गावांतही ...

ठळक मुद्देमहापालिका, ग्रामपंचायतींनी एकाचवेळी मोहीम राबवायला हवी

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा केवळ कोल्हापूर शहराचा नाही. शहरालगत असलेल्या उपनगरातही तो तितकाच गंभीर आहे. महापालिकेसह शहरालगतच्या ग्रामपंचायती, जिल्ह्यातील नगरपालिका यांनी एकाचवेळी मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम राबविली, तरच त्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसू शकेल.शिरोलीत गेल्या आठवड्यात एकाच दिवशी मोकाट कुत्र्याने २७ जणांचा चावा घेतल्याने शहरालगतच्या गावांतही हा प्रश्न तितकाच गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाचगाव, कळंबा, उचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, बालिंगे, शिंगणापूर ही गावे जणू कोल्हापूर शहराचाच भाग बनली आहेत. त्यामुळे तेथील कुत्री महापालिका हद्दीत आणि महापालिका हद्दीतील कुत्री ग्रामपंचायत हद्दीत फिरत असतात. त्यामुळे केवळमहापालिकेनेच कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम राबवून म्हणावे तसे यश येणार नाही. कारण लगतच्या गावांतील कुत्र्यांमुळे ही संख्या वाढतच जाणार आणि प्रश्न कायम राहणार आहे. यामुळे महापालिकेने ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन प्रसंगी मदतीचा हात देऊन एकाचवेळी ही मोहीम राबविणे आवश्यक आहे. (क्रमश:)इचलकरंजीत हजार कुत्र्यांची नसबंदीतीन महिन्यांपूर्वी इचलकरंजीतही मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला होता. नागरिकांतून संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर तेथील नगरपालिकेने या शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला. शहरात किती कुत्री असतील याचा नेमका आकडा नसला तरी अंदाजे चार हजार कुत्री असतील, असे गृहीत धरून यातील २००० कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील अरिहंत अ‍ॅनिमल्स वेलफेअर संस्थेला सुमारे ३० लाख रुपयांचे टेंडर देण्यात आले. या संस्थेने गेल्या अडीच-तीन महिन्यात एक हजारांवर कुत्र्यांची नसबंदी केली आहे. येत्या तीन महिन्यांत उर्वरित कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. एखादा प्रश्न युद्धपातळीवर सोडविण्याचा प्रयत्न इचलकरंजीसारखी नगरपालिका करू शकते; मग कोल्हापूर महापालिकेला काय अडचण आहे, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जाऊ लागला आहे.जयसिंंगपुरात कुत्री पकडण्याची मोहीमजून महिन्यात जयसिंगपूर शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला होता. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात काहीजण जखमी झाल्यानंतर जयसिंगपूर नगरपालिकेने मोकाट कुत्र्यांना पकडून लांब नेऊन सोडण्याचा ठेका देण्यात आला आहे. तसेच मोकाट कुत्र्यांवर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. येथील ठेकेदाराने २२ जूनपासून कुत्री पकडण्याची मोहीम सुरू केली. आतापर्यंत सुमारे साडेचारशे कुत्री पकडून ती शंभर-दीडशे किलोमिटर अंतरावर नेऊन सोडली आहेत. मात्र, यातील काही कुत्री पुन्हा शहरात दिसू लागल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. त्यामुळे कुत्र्यांना लांब नेऊन सोडण्यापेक्षा त्यांची नसबंदी करणे हाच चांगला पर्याय आहे.कुत्र्यांना वैतागलाय...तर मग लिहा...मोकाट कुत्र्यांना तुम्हालाही कधीतरी तोंड द्याव लागले असेल.. तुमचा चावा घेतला असेल अगर अपघात घडवला असेल.. ज्याची आठवण झाली की अजूनही भीती वाटते, संताप होतो. हे कुणाला तरी सांगावसं वाटतं, उपाय सुचवावेसे वाटतात.. तर मग करा आपलं मन मोकळं... लिहा आपल्या भावना, मते आणि पाठवा आमच्याकडे... (शब्दमर्यादा २०० ) आमचा पत्ता- लोकमत भवन, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, व्हॉटसअ‍ॅप नं.- ८९७५७५५७५४, koldesk@gmail.com

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdogकुत्रा