कोल्हापूर : कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील कोल्हापूर ऑक्सिजन या कंपनीला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी पहाटे तीनच्या सुमारास अचानक भेट दिली. त्यांनी त्याठिकाणी अर्धा तास थांबून ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा याबाबतची माहिती जाणून घेतली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्याचा पुरवठा सुरळीतपणे होण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी देसाई यांचे प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत त्यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती, पुरवठ्याची स्थिती जाणून घेण्यासाठी विविध ऑक्सिजन निर्मिती, फिलिंग सेंटरला भेट दिली. ते रविवारी पहाटे कोल्हापूर ऑक्सिजन येथे पोहोचले. या कंपनीतील शिफ्ट इन्चार्ज सुजित प्रभावळे यांनी जिल्हाधिकारी देसाई यांना ऑक्सिजन निर्मिती, विविध ठिकाणी केला जाणारा पुरवठा, आदींबाबतची माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे, कंपनीतील कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी अकरा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी देसाई हे कोल्हापूर ऑक्सिजन येथे थांबून होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते.
फोटो (०२०५२०२१-कोल-जिल्हाधिकारी फोटो) : कोल्हापुरात रविवारी पहाटे तीन वाजता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील कोल्हापूर ऑक्सिजन या कंपनीला भेट दिली. यावेळी शिफ्ट इन्चार्ज सुजित प्रभावळे उपस्थित होते.
===Photopath===
020521\02kol_5_02052021_5.jpg
===Caption===