कोल्हापूर : कुर्ता, पायजमा, फेटा, धोतर, कोल्हापुरी चप्पल, शेरवानी परिधान केलेेले पुरूष अधिकारी आणि नऊवारी साडी, चोळी, दागिने परिधान केलेल्या महिला अधिकारी, कर्मचारी शुक्रवारी शहरातील सर्वच शासकीय कार्यालयात पाहायला मिळाले. नेहमी विशिष्ट अशा वेशभूषेत दिसणारे सरकारी अधिकारी, कर्मचारी पारंपरिक वेशभूषेत अभ्यंगताना पाहायला मिळाले. यामुळे अनेक साहेबांच्या ओळखीचे अभ्यागत साहेब आज काय जोरात आहे, अशी विचारणाही केली. निमित्त होते, शाही दसरा महोत्सवानिमित्त आयोजित पारंपरिक वेशभूषा दिवसाचे.शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी एका पॅटर्ननुसार वेशभूषा करतात. अनेक पुरूष अधिकारी, कर्मचारी इनशर्ट केलेेले तर महिला अधिकारी, कर्मचारी पंजाबी ड्रेस परिधान केलेल्या असतात. पण शुक्रवारी सर्वच शासकीय कार्यालयातील वेगळेच चित्र पाहायला मिळाले. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी धोतर, कोल्हापुरी पायतान, लांब कुर्ता परिधान करून लक्ष वेधले.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी फेटा बांधून शेरवानी परिधान करून लक्ष वेधले. महिला अधिकारी, कर्मचारी नऊवारी साडी, चोळी परिधान केल्या होत्या. यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात वातावरण पारंपरिक पाहायला मिळाले.
..अन् कोल्हापूरचे जिल्हाधिकारी धोतर, फेटा बांधून आले कार्यालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 6:26 PM