जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रथम अल्फोन्सा स्कूल केविड सेंटर, करंजोशी, प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय कोविड सेंटर पेरिड, आंबा प्राथमिक केंद्र व पेरीड ग्रामपंचायतीला भेटी देऊन कोविड सेंटरची पाहणी केली. पेरिड गावातील ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करून लस घेतली का, सर्व्हे करण्यासाठी शासकीय व आरोग्य कर्मचारी घरी येतात का, याची महिती जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नागरिकांशी संपर्क करून विचारणा केली. पेरीड येथील अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी यांच्याकडून सर्व्हेची महिती घेतली व आशा कर्मचाऱ्यांना घराघरांत जाऊन सर्व्हे करा, असा आदेश दिला. ग्रामसेवक प्रवीण पवार यांचेकडून पेरिड गावात किती केविडचे रुग्ण आहेत. ग्रामपंचायतीने काय उपाययोजना केल्या याची महिती घेतली. कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सहित्याची महिती घेतली.
यावेळी प्रांताधिकारी बी. आर. माळी तहसीलदार गुरू बिराजदार, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, सरपंच मनिषा वाघ, उपसरपंच शिवाजी पाटील, माजी सरपंच आबाजी पाटील, ग्रामसेवक प्रवीण पवार, आशा कर्मचारी सौ. डवरी, सौ. गोसावी, तलाठी कुंभार दीपक वाघ, पोलीस पाटील संतोष पाटील शाखा अभियंता विजय वनमोरे आदींसह ग्रामस्थ, शासकीय, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
पेरीड (ता. शाहूवाडी) येथील गावात जाऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नागरिकांशी थेट संपर्क करून माहिती घेताना शेजारी गुरू बिराजदार, अनिल वाघमारे, बी. आर. माळी आदी.