शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

गडहिंग्लज-आजरा मार्गावर ट्रक व टेम्पोचा यांच्यात धडक, दोघेही चालक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 6:25 PM

gadhingalj, accident, kolhpaurnews गडहिंग्लज-आजरा मार्गावरील गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील नंदापाचीवाडीजवळ आज (सोमवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास गॅस वाहतूक करणारा ट्रक आणि दूधाच्या टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत टेम्पो चालक सुनिल शिवाजी मगदूम (रा. निंगुडगे, ता. आजरा) व ट्रकचालक संतोष तवनाप्पा मंडेद (रा. कित्तूर, जि. बेळगाव) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देगडहिंग्लज-आजरा मार्गावर ट्रक व टेम्पोचा यांच्यात धडक, दोघेही चालक गंभीरचार तास वाहतूक ठप्प, दोनही वाहनांचे नुकसान

गडहिंग्लज :गडहिंग्लज-आजरा मार्गावरील गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील नंदापाचीवाडीजवळ आज (सोमवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास गॅस वाहतूक करणारा ट्रक आणि दूधाच्या टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत टेम्पो चालक सुनिल शिवाजी मगदूम (रा. निंगुडगे, ता. आजरा) व ट्रकचालक संतोष तवनाप्पा मंडेद (रा. कित्तूर, जि. बेळगाव) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे गडहिंग्लज-आजरा मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली होती. घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, सोमवारी (१८) सकाळी किटवडे (ता. आजरा) रूटवरील गोकुळचे दूध घेवून गडहिंग्लजच्या दिशेने टेम्पो येत होता.दरम्यान, कणगला (ता. हुक्केरी) येथून गॅस सिलेंडर भरून घेवून मालवणकडे केए-५१, सी-२६०१ हा ट्रक आजरामार्गे जात होता. दोन्ही वाहने गिजवणेनजीकच्या नंदापाचीवाडीनजीक आंबेओहोळ ओढ्याजवळ आले असता एकमेकांना चुकविण्याच्या नादात समोरासमोर जोरात धडकली. दोन्ही वाहने जोराने धडकल्याने दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली. यामध्ये दोन्ही वाहनांचे चालक गंभीररित्या जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.वाहने रस्तावर उलटल्याने ट्रकमधील गॅस सिलिंडर टाक्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. टेम्पोतील दूधाचे कॅनही खाली पडल्यामुळे दूधाचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस व पालिकेच्या अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमी वाहनचालकांना गडहिंग्लजच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.गॅस वितरणचे कोणी तातडीने न आल्यामुळे सिलिंडर बाजूला सुरक्षितस्थळी हलविणे अडचणीचे झाले. त्यामुळे मार्गावरील दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहने थांबून होती. पोलिसांनी दक्षता म्हणून आजरा-गडहिंग्लज राजमार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. त्यानंतर गॅस टाक्या सुरक्षितपणे बाजूला करून व अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून तब्बल चार तासानंतर वाहतूक सुरळित सुरू झाली.रात्री उशीरापर्यंत या घटनेची पोलिसात नोंद सुरू होती.मोठा अनर्थ टळलाअपघातानंतर गॅस टाक्या लिक न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पालिकेच्या अग्निशमन पथकानेही कोणताही धोका म्हणून गॅस टाकीवर पाणी मारून सिलेंडर सुरक्षितस्थळी हलविले. तर दूधाच्या टेम्पोमधील दूधाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचा निश्चित आकडा समजू शकला नाही.

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर