कोल्हापूर : वनस्पतिजन्य रंगांच्या वापरासाठी निसर्गमित्र परिवारामार्फत घेण्यात आलेली चेहरा रंगवण्याची स्पर्धा विद्यार्र्थ्यांमध्ये चांगलीच रंगली. पर्यावरणाचा संदेश देत या स्पर्धेत पन्हाळा तालुक्यातील कळे येथील न्यू प्राथमिक विद्यालयातील सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विजेत्यांना वनस्पतीजन्य रंगांची पाकिटे भेट देण्यात आली.निसर्गमित्र परिवार, कोल्हापूर आणि वाघजाई देवराई संवर्धन समिती आणि आदर्श सहेली मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. पहिली ते चौथी हा छोटा गट आणि पाचवी ते सातवी असा मोठा गट अशा दोन गटांत ही स्पर्धा झाली. लेक वाचवा, पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन, पाणी बचत, जंगल संरक्षण, वाघ वाचवा, कचरा व्यवस्थापन असे संदेश विद्यार्थ्यांनी दिले.पराग केमकर यांनी वनस्पतिजन्य रंगाचे महत्त्व सांगितले, तर आदर्श सहेली मंचच्या राणिता चौगुले यांनी हे रंग घरच्या घरी कसे तयार करायचे याचे मार्गदर्शन केले. अनिल चौगुले यांनी वाघजाई परिसरातील रंग देणाऱ्या विविध वनस्पतींची माहिती देऊन खाद्यरंगाबद्दलची सविस्तर माहिती दिली.या स्पर्धेसाठी शहाजी माळी आणि राणिता चौगुले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे संयोजन ज्योतीराम पाटील, भारत चौगुले, यश चौगुले, शिवतेज पाटील यांनी केले. विलास पाटील यांनी आभार मानले.स्पर्धेत लहान गटात हर्ष झुरे याने प्रथम, अर्पिता पाटील हिने द्वितीय, वसुंधरा कोवे हिने तृतीय तर वरद पाटील, स्वराज झुरे, सिद्धेश पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. मोठ्या गटात दीपाली कुंभार हिला प्रथम, महंमदजैर जमादारला द्वितीय, श्रवण देसाईला तृतीय तर प्रतीक पाटील, वैष्णवी पाटील, करण पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.विजेत्यांना वनस्पतिजन्य रंगांची पाकिटे भेटकळे येथील न्यू प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन विठ्ठल पाटील आणि मुख्याध्यापक नामदेव नांदवडेकर यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व वनस्पतिजन्य रंगाची पाकिटे तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली.