शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

कोल्हापूूर-सूर्यवंशीच्या तयारीने रंगत

By admin | Published: September 15, 2014 12:49 AM

तरुणांमध्ये निर्माण केलेली क्रेझ पाहता दोन्ही प्रस्थापितांना ते घाम फोडणार, हे निश्चित आहे

राजाराम लोंढे-- कोल्हापूूर .. करवीर मतदारसंघातील तिरंगी लढत निश्चित झाली असून जनसुराज्य-शेकापचे राजेंद्र सूर्यवंशी यांची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडते, याची चर्चा जरी मतदार संघात असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे ताणलेले संबंध, सूर्यवंशी यांनी तरुणांमध्ये निर्माण केलेली क्रेझ पाहता दोन्ही प्रस्थापितांना ते घाम फोडणार, हे निश्चित आहे. गेल्यावेळी नरके व पाटील यांच्यातच खरी लढत झाली. संपतराव पवार तिसऱ्या क्रमांकावर राहीले. नरके यांनी निवडणुकीपूर्वी तीन वर्षे मतदारसंघांत ठेवलेला राबता, त्यांची कोरी असलेली पाटी व शेवटच्या टप्प्यात त्यांनी टाकलेले फासे यशस्वी झाल्याने ते विजयापर्यंत पोहोचू शकले. पाच वर्षांत समीकरणे बदलत गेली असून जनसुराज्य-शेकाप आघाडीने राजेंद्र सूर्यवंशी यांना रिंगणात उरतवले आहे. त्यांनी गेली दोन वर्षे मतदारसंघ पिंजून काढला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेससह काँग्र्रेस व शिवसेनेतील नाराज गट आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांनी व्यूहरचना केली आहे. आमदार विनय कोरे यांनी त्यांच्यासाठी ताकद लावली असली तरी पाच वर्षांत त्यांचे बहुतांशी कार्यकर्ते बाजूला गेल्याने गगनबावडा, पन्हाळ्यात किती पाठबळ मिळते यावरच येथील मताधिक्य राहणार आहे. आमदार नरके यांनीही ‘गाव तिथे विकासकाम’ पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. २०५ कोटींची विकासकामे केल्या दावा करत मतदारांशी थेट संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. लोकसभेला त्यांनी एकाकी झुंज देत संजय मंडलिक यांना ८६ हजार मतदान दिले, हे विसरता येणार नाही. हे जरी खरे असले तरी ही निवडणूक त्यांना तितकीशी सोपीही नाही. ‘कुंभी’ कारखान्याचे राजकारण, पाच वर्षांत या ना त्या कारणाने नाराजांची संख्याही वाढली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांची भूमिका व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष के. एस. चौगले यांची संभाव्य बंडखोरी आमदार नरके यांची डोकेदुखी ठरणार आहे. गेल्या निवडणुकीतील चुका सुधारत पी. एन. पाटील यांनी मतदारसंघात राबता ठेवला आहे. पन्हाळा, गगनबावड्यात स्वत:चे गट निर्माण करत जुन्या करवीरमध्ये काही पॅचवर्क केले आहे. गेल्यावेळेला गगनबावडा तालुका, परिते व सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघांत चांगले मताधिक्य मिळाले होते. पण यावेळी गगनबावड्यासह जुन्या सांगरुळमधील परिस्थिती काहीशी वेगळी आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘भोगावती’ च्या माध्यमातून राष्ट्रवादीला अंगावर घेतल्याने पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढू शकतात. के. एस. चौगले व ‘मनसे’चे अमित पाटील यांनीही तयारी सुरू केली आहे. चौगले यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. एकंदरीत सूर्यवंशी यांच्या उमेदवारीचा आपणालाच फायदा होणार, असा दावा पाटील व नरके गटाच्यावतीने होत आहे पण सूर्यवंशी यांनी घेतलेली मेहनत व आखलेले आडाखे पाहता पाटील व नरके यांना विजयी तितकासा सोपाही नाही. पन्हाळा-करवीरचे राजकारण उफाळणारगेल्यावेळी पन्हाळा तालुक्यातून पी. एन. पाटील यांना मतदान झाले नसून तालुक्यातील म्हणून नरके यांच्या पाठीशी पन्हाळ्यातील मतदार राहिल्याचा उघड आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. त्याची चर्चाही जोरात सुरू असून शेवटच्या टप्प्यात पन्हाळा-करवीर हा प्रचार जोरात राहण्याची शक्यता आहे. ‘पी. एन.’ यांचा मेळाव्यावर, तर नरके-सूर्यवंशी यांचा थेट संपर्कावर भर शिवसेनांतर्गत कुरघोडी नरकेंची डोकेदुखी ठरणार २००९चे मताधिक्यमतदार संघचंद्रदीप नरकेपी. एन. पाटीलजुना सांगरूळ--१६,५४६जुना करवीर १२,८०८-पन्हाळा१२,८९३-गगनबावडा-३,३४२