कोल्हापूर : गुलबर्गा (कर्नाटक) येथील कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य करून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘एमआयएम’चे नेते वारीस पठाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शिवाजी तरुण मंडळातर्फे दहन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी वारीस पठाण यांचा निषेध करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते सायंकाळी शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात जमा झाले. या ठिकाणी वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी वारीस पठाण मुर्दाबाद...च्या घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.गुलबर्गा येथील कार्यक्रमात वारीस पठाण यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले. त्यावेळी व्यासपीठावर त्यांचे नेते खासदार ओवैसीही होते. अशा प्रकारचे वक्तव्य करून आव्हान देण्याचे काम ही प्रवृत्ती करीत आहे. तरी अशा प्रवृत्तींना गाडण्याकरीता केंद्र सरकारने त्यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा अध्यक्ष सुजित चव्हाण, सचिव महेश जाधव आदींनी यावेळी दिला.नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा चांगला असून, त्याला नाहक विरोध करणे चूक असून त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन जाधव यांनी यावेळी केले. आंदोलनात मंडळाचे उपाध्यक्ष अजित राऊत, रविकिरण इंगवले, सुरेश जरग, सदाभाऊ शिर्के, लाला गायकवाड, अजित खराडे, अक्षय मोरे, राजू चव्हाण, शिवाजी जाधव, श्रीकांत भोसले, रोहित मोरे, निखिल कोराणे, विशाल बोंगाळे, प्रसाद इंगवले, सुनील राऊत, अभिजित कडोलकर, राजू जाधव, अभिजित राऊत, मंदार पाटील, प्रताप देसाई, आकाश सरनाईक, सदाशिव जाधव, आदी सहभागी झाले होते.