शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

"अडीच वर्षांच्या वनवासानंतर आपलं सरकार आलं; नवं काही उभं करण्यासाठी पुढं या, पाठबळ देऊ"

By समीर देशपांडे | Published: August 13, 2022 5:15 PM

रोज गळ्यात मफलर घालून कार्यक्रम करत फिरणे म्हणजे काम नव्हे.

कोल्हापूर : अडीच वर्षांच्या वनवासानंतर आपलं सरकार आलं आहे. वेळ कमी आहे. परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी, नवं काही उभं करण्यासाठी पुढं या. निश्चित पाठबळ देवू अशी ग्वाही नूतन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पाटील पहिल्यांदा आज, शनिवारी कोल्हापुरात आले. यानिमित्ताने कसबा बावडा येथील अलंकार हॉलवर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. पाटील म्हणाले, विकासाची कामे वाढवण्यासाठी यंत्रणाही वाढवणार आहोत. स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिकांसाठी काम करण्यासाठी पुढे या. आपलं सरकार धडाधड निर्णय घेत आहे. नसीमा हुरजुक, कांचनताई परूळेकर या वयातही काम करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी झपाटून काम करण्याची गरज आहे. रोज गळ्यात मफलर घालून कार्यक्रम करत फिरणे म्हणजे काम नव्हे, तर आपण नवं काही उभं केलं पाहिजे. यामध्ये ‘सबका साथ, सबका विकास’ सूत्र हवे.यावेळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते सुरूवातीलाच पाटील यांचा सत्कार करण्यता आला. यानंतर खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, नसीमा हुरजुक, अरूण इंगवले, राहूल चिकोडे, सत्यजित कदम, अशोक चराटी, महेश जाधव, भगवान काटे, विजय भोजे, राहूल देसाई, विजय जाधव, अशोक देसाई, सचिन बल्लाळ, उदयकुमार देशपांडे, महेश चौगुले, सुधीर कुंभार, सुनील कदम, अभयकुमार साळुंखे, क्रांतीकुमार पाटील, डी. आर. मोरे, राजाराम शिपुगडे, सुहास लटोरे, नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर, विजय खाडे, प्रविण सावंत, बाबा इंदूलकर, डॉ. संजय पाटील, माणिक पाटील चुयेकर, अजित ठाणेकर, अनिरूध्द कोल्हापुरे, नंदकुमार वळंजू, हंबीरराव पाटील, समीर नदाफ, सचिन तोडकर नजीर देसाई गायत्री राऊत, सौम्या तिरोडकर, मीलन होळणकर याच्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि बाराही तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.आज एन. डी. हवे होतेपाटील म्हणाले, आमच्या सरकारने उपसा जलसिंचन योजनांच्या वीजबिलामध्ये ३४७ कोटी रुपयांची सूट दिली. आज एन. डी. पाटील जिवंत असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. आता जुन्या बाकीचा विषय आहे. त्याबाबतही निर्णय होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील