कोल्हापूर : महाराष्ट्राच्या विकासासाठी मंत्रिमंडळात भाजपबरोबर शिवसेना आहे. निवडणुकीपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखविलेल्या महाराष्ट्राच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’नुसार शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताच्या निर्णयांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ती झाली नाही तर वेळप्रसंगी मी शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरेन, असा ‘घरचा आहेर’ परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी येथे सरकारला दिला. कोल्हापुरातील शिवसैनिकांनी केलेला सत्कार हा ‘घरचा सत्कार’ असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.कळंबा (ता. करवीर) येथील अमृतसिद्धी हॉल येथे जिल्हा शिवसेनेतर्फे राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.यावेळी जिल्हा शिवसेनेतर्फे अंबाबाईची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन मंत्री रावते यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक, आ. चंद्रदीप नरके, आ. राजेश क्षीरसागर, आ. उल्हास पाटील, आ. प्रकाश आबिटकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शुभांगी साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.रावते म्हणाले, वेदना जाणून घेणारा मी माणूस आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा गंभीर विषय असून, त्यामुळे आपणास औदासीन्य आले आहे. त्यामुळे आपण हार स्वीकारत नाही; परंतु कोल्हापूरचा सत्कार हा घरचा असल्याने तो याला अपवाद आहे. मी एक शिवसैनिक असून, त्यामुळे या ठिकाणी येताना मी माझे मंत्रिपद बाहेर गाडीत ठेवून आलो आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना लढत आली आहे. आता सरकार जरी असले तरी शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी शिवसेनेला आंदोलन करावे लागले तर मीही तुमच्यासोबत रस्त्यावर उतरेन. आम्ही कुणाबरोबर वाद करत नाही तर दिलेली आश्वासने पूर्ण करून ती जनतेपर्यंत पोहोचविणे हा आपला उद्देश आहे.प्रा. संजय मंडलिक म्हणाले, जिल्हा आता काँग्रेसमुक्त झाला असून लवकरच तो राष्ट्रवादीमुक्तही होईल.आ. क्षीरसागर म्हणाले, शिवसेना वाढीसाठी राज्यात कुणी काम केले असेल तर ते रावतेंनी. आता ते मंत्रिपदाच्या माध्यमातूनही एस. टी. व ‘आरटीओ’तील समस्या सोडवतील.आ. नरके म्हणाले, पक्षसंघटना मजबूत करून तळागाळातील कार्यकर्त्यांना तयार करण्याचे काम रावतेंनी केले आहे. त्यांचा आदरयुक्त धाक शिवसैनिकांवर आहे.जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी ‘काँग्रेस म्हणजे मिशी कापणारी कात्री, तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे मेहंदी कापणारी कात्री’ अशा शब्दांत दोन्ही पक्षांवर टीकास्त्र सोडले.जिल्हाप्रमुख जाधव म्हणाले, पक्षासाठी अहोरात्र राबविलेल्या शिवसैनिकांचा विचार करून त्यांना शासकीय कमिट्यांवर स्थान द्यावे. यावेळी आ. आबिटकर, आ. पाटील, विजय देवणे यांचे भाषण झाले.यावेळी शिवसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मी कोल्हापूरचाच मंत्री...जिल्ह्यातून सहा आमदार निवडून आले आहेत, तेव्हा जिल्ह्याला मंत्रिपद द्या. ते कुणालाही द्या, अशी मागणी प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आ. उल्हास पाटील यांनी आपल्या भाषणात केली. यावर रावते यांनी आपल्या भाषणात मला जर तुम्ही कोल्हापूरचे समजता तर मला मिळालेला मंत्रिपदाचा दिवा हा तुमचाच नाही का? अशी गुगली टाकली. यावर हास्याची लकेर उमटली. तुमच्या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.स्थानिक कमिट्या करताना पन्नास टक्के वाटा हवाजिल्ह्यात शिवसेनेची ताकद जादा आहे. त्यामुळे शासकीय समित्यांवर वर्णी लावताना पन्नास-पन्नास टक्केचा निकष लावावा, अशी मागणी मान्यवरांनी केली. यावर आ. क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात आम्ही पालकमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांना न्याय मिळेल, असे सांगितले.मी कोल्हापूरचाच मंत्री...जिल्ह्यातून सहा आमदार निवडून आले आहेत, तेव्हा जिल्ह्याला मंत्रिपद द्या. ते कुणालाही द्या, अशी मागणी प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आ. उल्हास पाटील यांनी आपल्या भाषणात केली. यावर रावते यांनी आपल्या भाषणात मला जर तुम्ही कोल्हापूरचे समजता तर मला मिळालेला मंत्रिपदाचा दिवा हा तुमचाच नाही का? अशी गुगली टाकली. यावर हास्याची लकेर उमटली. तुमच्या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.स्थानिक कमिट्या करताना पन्नास टक्के वाटा हवाजिल्ह्यात शिवसेनेची ताकद जादा आहे. त्यामुळे शासकीय समित्यांवर वर्णी लावताना पन्नास-पन्नास टक्केचा निकष लावावा, अशी मागणी मान्यवरांनी केली. यावर आ. क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात आम्ही पालकमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांना न्याय मिळेल, असे सांगितले.कॉँग्रेस-राष्ट्रवादी ही लुटारूंची कीड असून, त्यांनी जिल्ह्याची वाट लावली आहे. ते आता जवळ येतील, आले तर त्यांना दरवाजे उघडू नका, अशी मागणी संजय पवार यांनी रावतेंकडे केली. महापौर लाचप्रकरणात, तर विरोधी पक्षनेता बेटिंग प्रकरणात सापडले आहेत. यावरून ही कीड किती खोलवर रूजल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू
By admin | Published: February 06, 2015 12:16 AM