शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

दुर्लक्षामुळे फुलण्याआधीच कोमेजले ऑक्सिजन पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:44 PM

Agriculture Sector firenews kolhapur- निधीची कमतरता आणि सामाजिक वनीकरणच्या दुर्लक्षामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले शेंंडा पार्कातील ऑक्सिजन पार्क फुलण्याआधीच कोमेजून गेले. जळालेल्या ६० टक्केपैकी ८० टक्के वृक्ष हे थोडीशी देखभाल केली, तर जगण्याची आशा आहे. पण याचा खर्च करायचा कुणी, हाच कळीचा प्रश्न आहे. शासनाकडून संरक्षणाचा खर्च येत नसल्यानेच गेल्या आठ महिन्यांपासून या वृक्षसंपदेकडे सामाजिक वनीकरणने दुर्लक्ष केले, त्याची परिणती संपदा जळून खाक होण्यात झाली.

ठळक मुद्देशेंडा पार्कातील वृक्ष लागवड आगीच्या भक्ष्यस्थानी जळालेल्या ६० टक्केपैकी ८० टक्के वृक्ष जगण्याची आशा

कोल्हापूर : निधीची कमतरता आणि सामाजिक वनीकरणच्या दुर्लक्षामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले शेंंडा पार्कातील ऑक्सिजन पार्क फुलण्याआधीच कोमेजून गेले. जळालेल्या ६० टक्केपैकी ८० टक्के वृक्ष हे थोडीशी देखभाल केली, तर जगण्याची आशा आहे. पण याचा खर्च करायचा कुणी, हाच कळीचा प्रश्न आहे. शासनाकडून संरक्षणाचा खर्च येत नसल्यानेच गेल्या आठ महिन्यांपासून या वृक्षसंपदेकडे सामाजिक वनीकरणने दुर्लक्ष केले, त्याची परिणती संपदा जळून खाक होण्यात झाली.राज्य शासनाने २०१८ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना आणली होती. त्याअंतर्गत कोल्हापूरला दोन लाखाचे उद्दिष्ट होते. यातील ४० हजार वृक्षलागवड शेंडा पार्कात करण्याचा पर्याय पुढे आला. कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ सोडले, तर कुठेही एक हजाराहून अधिक झाडे एकत्र असणारे जंगल नाही.

आर. के. नगरकडे जाणाऱ्या शेंडा पार्कच्या या उघड्या माळावर सदाहरित जंगल तयार करण्याच्या आणि औषधी पारंपरिक वृक्ष लागवडीच्या माध्यमातून ऑक्सिजन पार्क तयार करण्याच्या हेतूने हा वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला. ही जागा कृषी महाविद्यालयाच्या मालकीची असल्याने तीन वर्षांनंतर वृक्षांसह हस्तांतरण करण्याच्या करारावर सह्या करुन सामाजिक वनीकरणने ९० एकर जागेवर ४० हजार रोपांची लागवड केली.तीन वर्षांच्या करारात या झाडांच्या लागवडीपासून ते त्यांच्या देखभालीपर्यंतची सर्व जबाबदारी सामाजिक वनीकरणने घेतली. यासाठी त्यांना प्रति झाड ४४६ रुपयेप्रमाणे १ कोटी ७८ लाखाच्या संरक्षण खर्चाची तरतूद देखील वन विभागाकडून करण्यात आली. पहिली दोन वर्षे निधी मिळत गेल्याने लावलेल्या ४० हजारपैकी ३५ हजार झाडे जगली. त्यांच्या संरक्षणासाठी चारही बाजूने चर खोदून स्थानिक लोकांचा हस्तक्षेपही थांबवण्यात आला. तथापि यावर्षी कोरोनामुळे संरक्षणासाठीचा शासनाकडून येणारा निधी वारंवार मागणी करुन देखील आला नाही. त्यामुळे एप्रिलपासूनच यातून सामाजिक वनीकरण विभागाने अंग काढून घेतले.

गवत कापणीविषयी वारंवार सांगून देखील वनीकरणने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी रविवारी एक हेक्टर क्षेत्राला आग लागून वृक्ष जळाले. तातडीने ते विझविण्यात आले. योग्य काळजी न घेतल्याने परत दुसऱ्याच दिवशी सोमवारी पुन्हा आग लागली आणि तब्बल ३० हेक्टरवरील वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.हस्तांतरणापूर्वीच घातसामाजिक वनीकरणसोबत झालेल्या करारानुसार येत्या एक एप्रिलला ही वनसंपदा कृषी महाविद्यालयाकडे हस्तांतरित होणार होती. दोन महिने उरले असतानाच आग लागल्याने यामागे दुसरे काही षड्‌यंत्र आहे का? अशीही चर्चा सुरु आहे. या जागेवर जंगल होऊ नये अशी अनेकांची मानसिकता आहे, त्यातूनच हा प्रकार घडला आहे का? यावरुनही आता तपास सुरु आहे.ही होती वृक्षसंपदा...आंबा, वड, पिंपळ, चिंच, लिंब, फणस, आवळा, आपटा, करंज, बहावा, उंबर, कोकम, कदंब, बकुळ.

आम्ही गेली दोन वर्षे चांगल्याप्रकारे झाडे जगवली, पण शासनाकडे मागणी केलेला ३३ टक्के निधी अद्याप मिळालेला नसल्याने या वृक्षसंपदेची देखभाल कशी करायची, मजुरांचे पगार कशातून भागवायचे, हा मोठा प्रश्न आहे.- मधुकर चंदनशिवे,सहायक उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण 

जळालेल्या वृक्षांपैकी ८० टक्के वृक्षांची झळीमुळे पाने गळाली आहेत. त्यांचा बुंधा हिरवा आहे. पाणी व खत व्यवस्थापन केले, तर त्यांना पालवी फुटू शकते, हे मंगळवारी केलेल्या पाहणीदऱम्यान दिसले आहे. त्यासंबंधीच्या सूचना सामाजिक वनीकरणला केल्या आहेत.- प्रा. एस. आर. शिंदे, कृषी महाविद्यालय कोल्हापूर

टॅग्स :fireआगAgriculture Sectorशेती क्षेत्रkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग