सरवडे : तालुक्यातील ३८ गावांतील शेतकऱ्यांना कृषी सेवा तात्काळ मिळावी, या हेतूने सरवडे येथे कृषी दिनाचे औचित्य साधून नवीन कार्यालय प्रारंभ करण्यात आला. या कार्यालयातून शेतकऱ्यांनी सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे माजी सदस्य आर. के. मोरे यांनी केले.
सरवडे (ता. राधानगरी) येथे नूतन कृषी मंडल कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती वंदना हळदे होत्या.
तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, कृषी पर्यवेक्षक डी. बी. आदमापुरे, पं. स. कृषी अधिकारी सुमित शिंदे यांनी विविध योजना व शेत पिकांचे उत्पन्न वाढीसंबंधीची माहिती विशद केली. कृषी मंडल कार्यालयाचे उद्घाटन बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे यांनी केले. कृषी दिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेत विजेते ठरलेले प्रथम रंगराव पाटील (पिरळ), द्वितीय अशोक तिकोडे (गुंडाळवाडी), तृतीय रामचंद्र पाटील (बुजवडे) चतुर्थ आण्णासो पाटील (आवळी बुद्रुक) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या सविता चौगुले, पंचायत समिती सदस्य उत्तम पाटील, सदस्या कल्पनाताई मोरे, सोनाली पाटील, ग्रामसेवक श्री. बोटे,
गणेश पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
प्रा. अतुल कुंभार यांनी सूत्रसंचालन केले, तर कृषी पर्यवेक्षक डी. बी. आदमापुरे यांनी आभार मानले.
०१ सरवडे कृषी दिन
फोटो
सरवडे येथे नवीन कृषी मंडल
कार्यालयाचे उद्घाटन करताना बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, सभापती वंदना हळदे, युवराज पाटील व इतर मान्यवर.