शहरं
Join us  
Trending Stories
1
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
2
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
3
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
4
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
5
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
6
Ration Card धारकांसाठी मोठी बातमी! ५.८ कोटी शिधापत्रिका होणार रद्द; तुमचं नाव तर यात नाही ना?
7
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
8
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत, म्हणाले, "मी माझ्या कुटुंबाविषयी क्वचितच बोलतो कारण..."
9
'खलनायक'मधील साँगसह Yashasvi Jaiswal साठी आला टीम इंडियासाठी 'नायक' होण्याचा संदेश
10
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
11
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
12
Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल?
13
राज्यातील २३ मतदारसंघ... ज्यांच्यावर २३ नोव्हेंबरला असेल अख्ख्या महाराष्ट्राची नजर; उलथापालथ होणार?
14
‘लोकल’ बंद न ठेवता ‘त्यांनी’ केले मतदान;  रेल्वे प्रशासनाची प्रशंसनीय व्यवस्था
15
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!
16
IAS ची पत्नी असल्याचं खोटं सांगून कोट्यवधींची फसवणूक; किटी पार्टीच्या नावाखाली महिलांना गंडा
17
बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO; आतापासूनच GMP मध्ये तुफान तेजी
18
भारीच! 'या' २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान; ८४.७९ टक्केवाला 'टॉपर'
19
"सगळं ओक्केमध्ये असेल तर..." कॅप्टन बुमराहचं सहकारी शमीसंदर्भात मोठं वक्तव्य
20
पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल दाखल;आठवडाभर टेस्टिंग; प्रवाशांना दिलासा

कोकणात सागरी कासवांच्या विणीच्या हंगामाला प्रारंभ; गुहागरच्या किनाऱ्यावर मिळाले पहिले घरटे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 2:04 PM

संदीप आडनाईक  कोल्हापूर : सागरी कासवांच्या विणीचा हंगामातील पहिले घरटे कोकण किनारपट्टीवर गुहागर किनाऱ्यावर मिळाले आहे. वन विभागाच्या नोंदीनुसार ...

संदीप आडनाईक कोल्हापूर : सागरी कासवांच्या विणीचा हंगामातील पहिले घरटे कोकण किनारपट्टीवर गुहागर किनाऱ्यावर मिळाले आहे. वन विभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १५ किनाऱ्यांवर कासवांची घरटी सापडतात.हिवाळ्याच्या तोंडावर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सागरी कासवांची वीण होते. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. या कालावधीत समुद्री कासवांमधील 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर ग्रीन सी कासवांची घरटी देखील सापडली आहेत. यंदापासून कासव संवर्धनाच्या कामाच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी कांदळवन कक्षाच्या खांद्यावर असणार आहे.सागरी कासवांच्या विणीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुहागरच्या किनाऱ्यावर राज्यातील सागरी कासवांची सर्वात जास्त घरटी आढळतात. सहा किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावर गेल्यावर्षी २९८ घरटी आढळून आली होती. यंदाच्या हंगामातील पहिले घरटे शुक्रवारी सकाळी गुहागरच्या किनाऱ्यावर आढळल्याची माहिती रत्नागिरीच्या विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी दिली. यामध्ये आढळलेल्या ११७ अंड्यांना कासवमित्रांनी हॅचरीमध्ये सुरक्षित हलविल्याचे त्यांनी सांगितले.

तीन हॅचरीमधून कासव संवर्धनगुहागर किनाऱ्यावर सहा कासवमित्रांच्या मदतीने कासव संवर्धनाचे काम होते. यासाठी दोन हॅचरी तयार करण्यात येतात. मात्र, गुहागर किनाऱ्यावर कासवांची घरटी सापडण्याची वर्षागणिक वाढणारी संख्या लक्षात घेता, तीन हॅचरी बांधून कासव संवर्धनाचे काम करणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी कोकण किनारपट्टीवरून समुद्री कासवांची १ लाख ५८ हजार ८७३ पिल्ले समुद्रात सोडली होती. तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची २ हजार ५६६ घरटी आढळली होती आणि पिल्लांच्या जन्म होण्याचा दर ६४ टक्के होता. हा दर यंदाही कायम आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग