शेती क्षेत्रातील नोंदणीकृत सरकारी पाणंदीच्या रस्त्यांचे रुंदीकरण, खडीकरण व दुतर्फा वाढलेली अतिक्रमणे काढण्यात आली. अनेक वर्षांपासून सरकारी पाणंदीच्या रेंगाळलेल्या कामांना चालना मिळाली आहे. पाणंदीच्या दुरुस्तीमुळे शिवारातील दळणवळण, ऊस वाहतुकीची सोय होणार आहे.
यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले, सर्कल प्रवीण माने, तलाठी एन. पी. पाटील, ग्रामसेवक एस. बी. पाटील, डी. एम. सूर्यवंशी उपस्थित होते.
फोटो : २९ कसबा बीडा पाणंद रस्ता
ओळ :
कसबा बीड ( ता. करवीर ) येथील सरकारी पाणंदी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भांबरे यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी राजेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी जयवंत उगले, तलाठी एन. पी. पाटील, ग्रामसेवक एस. बी. पाटील उपस्थित होते.