कोल्हापूर : बेंगलोरमधील कर्नाटक चित्रकला परिषद, आर्ट गॅलरीत युनाते क्रिएशनच्यावतीने आयोजित चित्रप्रदर्शनाचे उदघाटन चित्रकार कृष्णा शेट्टी यांच्याहस्ते शनिवारी झाले.
यावेळी शेट्टी यांनी लॉकडाऊननंतर वैविध्यपूर्ण कलाकृती प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव मिळावा, चित्रकाराने शैली जपून सातत्य ठेवल्यास कलाकृतीची उत्तरोत्तर प्रगती होते, असे मत व्यक्त केले. यावेळी ओंकोन आर्ट गॅलरीच्या सदस्या शर्बानी चॅटर्जी यांनी लाॅकडाऊननंतरचे कर्नाटक चित्रकला परिषद, आर्ट गॅलरीमधील पहिलेच ऑफलाईन प्रदर्शन असल्याचे सांगितले. या प्रदर्शनात वॉटरकलर, ॲक्रेलिक आणि प्रिंट मेकिंग माध्यमातील कलाकृती वास्तववादी ते अमूर्त शैलीतील चित्रे प्रदर्शित केली आहेत. हे प्रदर्शन सोमवार (दि. ६) पर्यंत सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३० पर्यंत कला रसिकांसाठी खुले आहे.
--
फोटो नं ०४०९२०२१-कोल-चित्रप्रदर्शन
ओळ : बेंगलोरमधील कर्नाटक चित्रकला परिषद, आर्ट गॅलरीत युनाते क्रिएशनच्यावतीने आयोजित चित्रप्रदर्शनाचे उदघाटन चित्रकार कृष्णा शेट्टी यांच्या उपस्थितीत झाले.
--