लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वारणा बझार शाखा वडगाव (ता. हातकणंगले) येथे समृध्दी सोलरच्या ३० किलोवॅटच्या सिस्टिमचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष देसाई यांच्याहस्ते करण्यात आले.
समृध्दी सोलरचे सीईओ पी. बी. पाटील म्हणाले, वाढत्या वीज बिलांवर रूफ टॉप सोलर हा सर्वोत्तम पर्याय आहे. पूर्वी जिथे वीज नाही, त्याठिकाणीच रूफ टॉपचा वापर केला जायचा. मात्र आता सगळीकडेच गरज बनली आहे.
बझारचे सरव्यवस्थापक शरद महाजन म्हणाले, वीज बिलाचा आर्थिक ताण बनत चालला आहे. त्यावर उपाय म्हणून दर्जेदार सेवा म्हणून समृध्दी सोलरची निवड केली आहे.
यावेळी बझारचे संचालक विश्वनाथ पाटील, शाखा व्यवस्थापक श्रीधर लंबे, प्रताप देसाई, हुसेन अरब आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :
वारणा बझार शाखा वडगाव (ता. हातकणंगले) येथे समृध्दी सोलरच्या ३० किलोवॅटच्या सिस्टिमचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष देसाई यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पी. बी. पाटील, शरद महाजन, विश्वनाथ पाटील, श्रीधर लंबे आदी उपस्थित होते. (फोटो-०८०१२०२१-कोल-समृध्दी न्यूज)