लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सुरज पवार यांचा हिलिंग हॅन्ड्स इन कॅन्सर या पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. नागपूरमध्ये दोन जानेवारीला इन्स्पायर ॲवॉर्डस् शो नावाने हा कार्यक्रम झाला. वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊनच या पुरस्कारासाठी निवड झाली.
डॉ. पवार यांनी अन्ननलिकेच्या कॅन्सरची अवघड शस्त्रक्रिया सोपी करून जगात भारताचा नावलौकिक वाढवला. अमेरिकेने देखील या वैद्यकीय संशोधनाची दखल घेत ‘द पवार टेक्निक’ या नावाने पाठपुस्तकात समावेश केला आहे.
कॅन्सर सर्जन झाल्यानंतर परदेशात राहण्याऐवजी डॉ. पवार भारतात परतले. कोल्हापुरात संपूर्ण कॅन्सरचे उपचार एका छताखाली आणले. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक या भागातील रुग्णांचे पुण्या-मुंबईचे हेलपाटे वाचले. आजपर्यंत रुग्णालयामध्ये १० हजार शस्त्रक्रिया व ५० हजार केमोथेरपी तंत्राद्वारे रुग्णांना बरे केले आहे. यातील ८० टक्के उपचार हे जनआरोग्य योजनेखाली मोफत केले आहेत.
फोटो: ०८०१२०२०-कोल-कॅन्सर न्यूज