कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) येथे कोविड लसीकरणास सरपंच मयूर जांभळे यांच्याहस्ते प्रारंभ झाला. परिसरातील वयोवृध्द व ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची मोहीम सुरू असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात कोविडबाबत जनजागृती व लसीकरणाबाबत आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षितता म्हणून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सरपंच मयूर जांभळे यांनी केले आहे.
यावेळी उपसरपंच पंकज कांबळे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जांभळे, पांडुरंग वाडकर, विजय जांभळे, कृष्णात माळी, अजित कांबळे, ग्रामसेवक आर. आर. भगत, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा शेटे, आरोग्य सेविका छाया चिले, आरोग्य सेवक अजित पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :
बालिंगे (ता. करवीर) येथे कोविड लसीकरणाचा प्रारंभ सरपंच मयूर जांभळे यांच्याहस्ते झाला. यावेळी उपसरपंच पंकज कांबळे, सदस्य उपस्थित होते.
(फोटो-०६०४२०२१-कोल-बालिंगे)