(दुसऱ्यांदा पाठवत आहे)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंचगंगा बँकेच्या वतीने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा देण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष राजाराम शिपुगडे यांनी जाहीर केला. बँकेच्या देवकर पाणंद शाखेत सुवर्णमहोत्सवी प्रारंभाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
सुवर्णमहोत्सवी प्रारंभाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शहर उपनिबंधक पी. एल. जगताप, राष्ट्रपती पदक विजेते पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. जीवनधारा ब्लड बँकेच्या सहकार्याने १०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
अध्यक्ष शिपुगडे म्हणाले, छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. बँकेने सोनेतारण आणि वाहन तारणावरील कर्जाचा व्याजदर कमी केला आहे.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डाव्या हातात ठेवीदारांचा विश्वास आणि उजव्या हातात कर्जदारांची पत यावरच बँकेची प्रगती अवलंबून असते. लहान मुलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी पिगी बँक योजनेची सुरुवात हा स्तुत्य उपक्रम आहे.
उपनिबंधक जगताप, तानाजी सावंत यांचीही भाषणे झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फडणीस यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष राहुल भोसले यांनी आभार मानले. यावेळी बँकेचे संचालक पी. एस. कुलकर्णी, विकास परांजपे, दिगंबर जोशी, चंद्रशेखर धर्माधिकारी, उपेंद्र सांगवडेकर, संदीप पाटील, भालचंद्र साळोखे, विजय चव्हाण, विवेक शुक्ल, डॉ. माधुरी कुलकर्णी, वृषाली बंकापुरे, महाव्यवस्थापक सुशील कुलकर्णी यांच्यासह सभासद, ग्राहक उपस्थित होते.
२७०२२०२१ कोल पंचगंगा बँक न्यूज फोटो
कोल्हापुरातील पंचगंगा बँकेच्या सुवर्णमहोत्सवाच्या प्रारंभ कार्यक्रमामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, शहर उपनिबंधक पी. एल. जगताप, बँकेचे अध्यक्ष राजाराम शिपुगडे, उपाध्यक्ष राहुल भोसले उपस्थित होते.