कोल्हापूर : कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँकेची १०७ वी वार्षिक सभा ऑनलाईन झाली. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कदम होते. अध्यक्ष कदम म्हणाले, बँकेस आर्थिक वर्षात २० कोटी ९ लाख रुपये ढोबळ नफा तर ४ कोटी १ लाख रूपये निव्वळ नफा झाला आहे. बुडित संशयित खात्यास ४९ कोटी ९० लाखांची तरतूद केली आहे. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असून थकीत कर्ज वसुलीसाठी कायदेशीर कारवाई सुरू आहे. सभासद कल्याण निधीतंर्गत पूरग्रस्त सभासदांना पाच हजार रुपयांप्रमाणे ५१ लाखांची तर कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधक उपायांसाठी मुख्यमंत्री सहाय्यनिधीसाठी २ लाख ५१ हजारांची मदत केल्याचेही अध्यक्ष कदम यांनी सांगितले. दिलीप पाटील, डॉ. कृपलाणी, सुलोचना नायकवडी, पंडित कंदले, हारूण मोमीन, शिवाजी कुपटे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चौगुले यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष मधुसुदन सावंत यांनी आभार मानले.
फोटो ओळी : कोल्हापूर अर्बन बँकेच्या ऑनलाईन सभेत अध्यक्ष शिवाजीराव कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गीता जाधव, शिरीष कणेरकर, सुरेश चौगुले, मधुसुदन सावंत आदी उपस्थित होते. (फोटो-२९०३२०२१-कोल-कोल्हापूर अर्बन)