कोल्हापूर : साळोखेनगरातील प्राथमिक शिक्षकांची को-ऑप हौसिंग सोसायटीच्या सांस्कृतिक सभागृहाला गेल्या दोन वर्षांपासून कुलूप घातले आहे. त्यामुळे उपक्रम बंद झाले असून, येथील सभागृह खुले करावे, या मागणीचे निवेदन परिसरातील महिलांनी महापालिकेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना मंगळवारी दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, संस्थेच्या सभागृहात वर्षभर अनेक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवत असतो. सोसायटीमधील महिलांना या उपक्रमाचा लाभ होतो. योगासने, रांगोळी, चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, पारंपरिक उत्सव साजरे केले जातात; परंतु महापालिकेने संस्थेच्या सभागृह सील केले आहे. गेले दोन वर्षांपासून सर्व उपक्रम बंद आहेत. याचे आरोग्यावर परिणाम होत आहेत. त्यामुळे पुन्हा सभागृह खुले करावे. यावेळी शिल्पा तेंडुलकर, नेहा तेंडुलकर, मृणाल तेंडुलकर, मंगल महाजन, शीला महाजन, सविता साळोखे आदींची उपस्थिती होती.
फोटो : ०९०३२०२१ कोल तेंडूलकर न्यूज फोटो
ओळी : साळोखेनगरातील प्राथमिक शिक्षकांची को-ऑप हौसिंग सोसायटी येथील सांस्कृतिक सभागृह खुले करण्याची मागणी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे परिसरातील महिलांनी केली.