कोल्हापूर : येथील वसंतराव चौगुले सहकारी पतसंस्था सभासदांचा १० लाखांपर्यंतच विमा उतरविणार असल्याची घाेषणा पतसंंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेऊनच पतसंस्थेची सभा खेळीमेळीत झाली.
सरव्यवस्थापक एम.एस. पाटील यांनी इतिवृताचे वाचन केले. पाटील यांनी अहवाल वाचन करताना पतसंस्थेने कोरोना काळातही २०० कोटींचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करण्यास सहकार्य केल्याबद्दल सभासदांचे आभार मानले. सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या पतसंस्थेने चालू आर्थिक वर्षात २२ कोटींनी ठेवीत वाढ केली आहे. या यशाबद्दल पतसंस्थेतर्फे १० टक्के लाभांश जाहीर केला. यावेळी अरुण मणियार, रामगाेंडा जिन्नावार, संजय देसाई, आनंदराव भालकर, संजय भिवटे, चंद्रकांत आरेकर, मधुकर पाटील यांची उपस्थिती होती.
फोटो: २४०२२०२१-कोल-चौगुले पतसंस्था
फोटो ओळ : कोल्हापुरातील वसंतराव चौगुले पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले.