पावसाळ्यात व हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याची मजा काही औरच असते; परंतु त्यासाठी गॅस किंवा चुलीवर पाणी तापवणे हे तसे त्रासाचे काम असते. तसेच ते अधिक वेळ घेणारे आणि खर्चिक असते. हेच गरम पाणी रॉनिक इन्स्टंट वॉटर हीटिंग सिस्टीममुळे अवघ्या काही सेकंदांत मिळते. ग्राहकांची मागणी आणि गरज ओळखून कंपनीने रॉनिक वॉटर हीटिंग सिस्टीम बाजारात आणली आहे. यामध्ये खर्च कमी आणि सुरक्षितताही जपली आहे. काही सेकंदांतच गरम पाणी मिळते. केवळ एका युनिटमध्ये ७० ते १०० लिटर गरम पाणी मिळते. ही सिस्टीम इतर गॅस इलेक्ट्रिक गिझरपेक्षा स्वस्त असून वीज, वेळ, श्रम आणि पैशांचीही बचत होते. याची फायबर बॉडी हिटप्रुफ असून शॉक लागणे किंवा गंज लागणे असे कोणतेही प्रकार होत नाहीत. तरी ग्राहकांनी शोरूमला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो : १२१२२०२० कोल ओमकार न्यूज फोटो