कोल्हापूर : येथील श्री महालक्ष्मी को -ऑपरेटिव्ह बॅंकेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि गायक विनोद डिग्रजकर यांची, तर उपाध्यक्षपदी प्रसिद्ध सीए महेश धर्माधिकारी यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या निवडी झाल्या.
अध्यक्षपदासाठी डिग्रजकर यांचे नाव प्रकाश सांगलीकर यांनी सुचवले, तर श्रीकांत हेर्लेकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी धर्माधिकारी यांचे नाव ॲड. रवी शिराळकर यांनी सुचवले. सीए केदार हसबनीस यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक अड. राजेेंद्र किंकर, संदीप कुलकर्णी, ॲड. नरेंद्र खासबारदार, उदय महेकर, ॲड. रघुनाथ लाटकर, पदमजा आपटे, मेधा जोशी, नितीन डोईफोडे, कृष्णा काशिद, प्रशांत कासार, ॲड.अशोक मुंडरगी उपस्थित होते.
डिग्रजकर यांनी याआधीही दोन वेळा या बॅंकेचे अध्यक्षपद भूषवले होते. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अ श्रेणीचे गायक कलाकार असलेले डिग्रजकर हे प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत. धर्माधिकारी यांनीही याआधी बॅंकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. सहकार भारतीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, नागरी सहकारी बॅंक असोसिएशनचे उपाध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲंड इंडस्ट्रीजचे संचालक आणि सावली केअर सेंटरचे विश्वस्त म्हणून अनेक वर्षे ते कार्यरत आहेत.
१८०१२०२१ कोल विनोद डिग्रजकर
१८०१२०२१ कोल महेश धर्माधिकारी