कोल्हापूर : एम जी हेक्टर, हेक्टर प्लस, झेड एस इलेक्ट्रिक कार आणि एम जी ग्लोस्टर या कार्सना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर माॅरिस गॅरेजेस या ब्रिटिश ब्रँडने हेक्टर २०२१ आणि हेक्टर प्लस ७ सीटर ऑपशनमध्ये या दोन प्रीमियम एसयूव्ही कार बाजारात आणल्या आहेत. या कार युनिकच्या शिरोली एम जी कोल्हापूर शोरूममध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
नवीन हेक्टर २०२१ मध्ये पूर्वीच्या हेक्टर कारप्रमाणे इंटरनेट इन्साइड व्हाइस कमांड, पेनोराॅमिक सॅनरूफ या फीचर्ससोबत १८ इंच ड्यूअल टोन अलाॅय व्हील, शॅम्पेन ड्यूअल टोन इंटेरिअर, वायरलेस चार्जर, ऑटो डिमिन्ग आयआरव्हीएम, व्हेंटिलेटेड फ्रंट सीटस् असे नवीन बदल कारमध्ये करण्यात आले आहेत. याशिवाय नवीन हिंदी ३७ प्रकारच्या व्हाइस कमांड इंफोटेन्मेट सिस्टीममध्ये दिल्या आहेत. कंपनीने हेक्टर २०२१ कारची प्रारंभिक एक्स शोरूम किंमत १२.८९ लाख इतकी ठेवली आहे, तर हेक्टर प्लस ७ सीटरची एक्स शोरूम किंतम १३.३४ लाख इतकी ठेवली आहे. या सर्व कार सर्व ग्राहकांना नक्कीच आवडतील. कार पाहण्यासाठी युनिकच्या शिरोली येथील एम जी कोल्हापूर शोरूममध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती युनिक ऑटोचे मॅनेजिंग डायरेक्टर विशाल चोरिडया यांनी दिली.
फोटो : ११०१२०२१-कोल- युनिक ऑटो
ओळी : युनिकच्या शिरोलीतील एम जी कोल्हापूर शोरूममध्ये हेक्टर प्लस ७ सीटर व हेक्टर २०२१ च्या लाँचिंगप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.