नेसरी : पंचायत समिती निवडणुकी वेळी नेसरीने मला मताधिक्य देऊन विजयाची संधी दिली. नेसरी विभागाने नेहमीच मला आपलेसे मानून सहकार्य केले आहे. त्यामुळे नेसरीच्या विकासाची माझी जबाबदारी असून नेसरीच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पं. स. सदस्य विद्याधर गुरबे यांनी दिली. ते येथील बेरड नाईक समाजाच्या लक्ष्मी मंदिर सुशोभिकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. एप्रिलपर्यंत ५० लाखांचा निधी आणण्याचा प्रयत्न सुरू असून निधी उपलब्ध होताच गावातील अन्य कामांनाही निधी देणार असल्याचे गुरबें यांनी सांगितले. पंचायत समिती स्वनिधी उपलब्ध करून दिला दिल्याबद्दल विद्याधर गुरबे यांचा सरपंच आशिषकुमार साखरे, उपसरपंच अमर हिडदुगी, शिवाजीराव हिडदुगी, आप्पाजी नाईक, प्रसाद करमळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी वीरशैव बँक संचालक महादेव साखरे, काशिनाथ शिंत्रे, एम. एस. तेली, हडलगेचे माजी उपसरपंच अनिल पाटील, रौप मुजावर, कार्तिक कोलेकर, जानबा नाईक, सदाशिव नाईक, संजय नाईक, सचिन नाईक, विनायक नाईक, सुभाना नाईक उपस्थित होते.
फोटो ओळी : नेसरी येथे बेरड नाईक समाजाच्या लक्ष्मी मंदिर सुशोभिकरण प्रसंगी विद्याधर गुरबे, महादेव साखरे, काशिनाथ शिंत्रे, एम. एस. तेली, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०४०३२०२१-गड-०९