हेरले : चोकाक गावचा सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी दिली. चोकाक (ता. हातकणंगले) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
गावातील गटारे, रस्ता व ग्रामपंचायत आवारात मिनी वॉटर प्लांट या कामांचे उद्घाटन माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील, पंचायत समिती सदस्य मेहरनीगा जमादार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच मीनाक्षी पाटील, उपसरपंच लता पाटील, ग्रामसेवक अनुपमा सिदनाळे, डॉ. अस्मिता ढवळे, पोलीस पाटील सचिन कुंभार, महादेव बळवंत चव्हाण, एच. एस. कामत, जयसिंग ढेरे, अभय कुमार, बाळासो कदम, सुरज सुतार, कृष्णा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो १८ चोकाक विकासकाम
चोकाक येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील, पंचायत समिती सदस्य मेहरनीगा जमादार, सरपंच मीनाक्षी पाटील, उपसरपंच लता पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.