नेसरी : हडलगे गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार राजेश पाटील यांनी दिली. हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे हडलगे-सांबरे रस्त्यावरील ओढ्यावरील पूल बांधकाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
पूल बांधकामासाठी ५० लाख मंजूर असून, गावातील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख मंजूर झाले आहेत.
पाटील म्हणाले, गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन कामे करण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. यावेळी आमदार पाटील यांनी स्व. बाबासाहेब कुपेकरांच्या विकासकामांच्या कार्याला उजाळा दिला.
उपसरपंच टी. एस. पाटील, माजी सरपंच विष्णू पाटील यांची भाषणे झाली. यावेळी चंदगड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष रामाप्पा करिगार, मार्केट कमिटी अध्यक्ष अभय देसाई-अडकूरकर, मुन्नासोा नाईकवाडी, सरपंच लता पाटील, ग्रामपंचायत सदस्या आशा पाटील, कविता मोहिते, सुधा प्रधान, विजया कुंभार, आर. जी. नाईक, बाबूराव पाटील, आण्णाप्पा पाटील, भावकू पाटील, कोवाडकर मामा, ईश्वर नाईक, सदाशिव कांबळे, अशोक कांबळे, सुभाष कांबळे, पांडुरंग दुंडगेकर, अमर हिडदुगी, दयानंद नाईक, पी. के. पाटील, गोविंद नांदवडेकर यांच्यासह नेसरी पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रकांत लोहार यांनी सूत्रसंचालन केले. गुलाबराव पाटील यांनी आभार मानले. फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील हडलगे-सांबरे रस्त्यावरील पूल बांधकामाचा प्रारंभ आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी लता पाटील, बाबूराव पाटील, टी. एस. पाटील, विष्णू पाटील, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०१०४२०२१-गड-०१