सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीमध्ये मी गेली १५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करीत आहे. यामधील काही कालावधी हा उपसरपंच पदावर काम केले आहे. येणाऱ्या पुढील पंधरा ते वीस वर्षांचा दृष्टिकोन समोर ठेऊन सिद्धनेर्ली ग्रामपंचायत राज्यात एक मॉडेल तयार होईल, असा आराखडा आम्ही तयार करणार असल्याचे सिद्धनेर्लीचे नूतन सरपंच दत्तात्रय पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, शाश्वत विकास कशाला म्हणतात हे नामदार हसन मुश्रीफ यांनी संपूर्ण जिल्ह्याला दाखवून
दिले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सिद्धनेर्लीचा शाश्वत विकास आम्ही करणार आहोत. कोणतेही राजकीय गट-तट
न पाहता सर्वांना समाविष्ट करून लोकसहभागातून विकासाकडे
सर्वांना घेऊन जाणार आहोत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सुसज्ज ग्रंथालय आम्ही उभे करणार आहोत. गावातील
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडांगण उभे करणे सुरू आहे. यामध्ये क्रिकेट, व्हॉलिबॉल, कबड्डी, ओपन जिम, कुस्ती या खेळांसाठी व्यवस्था या माध्यमातून आम्ही करणार आहोत. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गावातील सर्वच घटकांना योग्य न्याय देऊन
गावांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. रस्ते, अंतर्गत गटरी, लाईट व्यवस्था, शौचालय अशी कामे करून गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्ट राहील. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास खाते हे आम्हाला भरपूर काही देऊन जाईल, अशी सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने करून विश्वासास
पात्र राहू, असे पाटील यांनी सांगितले.
१४ दत्तात्रय पाटील सरपंच सिद्धानेर्ली