शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

सामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू व्हावा

By admin | Published: January 21, 2016 11:50 PM

श्रीपाद नाईक : कुरुंदवाडात भाजपचा मेळावा; एस. के. पाटील चौकाचे नामकरण

कुरुंदवाड : विकासाचा उपयोग स्वत:साठी केला तर तो विकास ठरत नाही. त्याला सामाजिक रूप देणे गरजेचे आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विकास केल्यास शहराचा पर्यायाने देशाचाच विकास होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.येथील डॉ. संजय पाटील विचार मंचतर्फे आयोजित सहकारमहर्षी एस. के. पाटील चौकाचे नामकरण व भाजप मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री नाईक बोलत होते. अध्यक्षस्थानी मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील होते, तर आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील माळभागातील एस. के. पाटील चौकाचे नामकरण मंत्री नाईक यांच्या हस्ते झाले.नाईक म्हणाले, सहकारात नि:स्वार्थीपणे काम करून सहकाराची ताकद उभी केली तर कुणाकडेही हात पसरण्याची वेळ येणार नाही. मात्र, झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी चुकीच्या मार्गाने पैसा मिळविण्यासाठी चालविलेली चढाओढ देशाला घातक आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. ग्रामविकासासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या थेट निधीचा ग्रामपंचायतीने योग्य विनियोग करावा.आ. हाळवणकर म्हणाले, डॉ. संजय पाटील भाजपमध्ये आल्याने त्यांचा राजकीय वनवास संपला आहे. सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा भाजप पक्ष असल्याने कार्यकर्त्यांसाठी आणि देशासाठीही ‘अच्छे दिन’ येणार आहेत.यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, बाबा देसाई, नगराध्यक्षा मनीषा डांगे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, आदींची भाषणे झाली. यावेळी तालुक्यातील नूतन सरपंच, जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राजेंद्र देशमुख, पोपट पुजारी, महावीर तकडे, भाजपचे तालुकाध्यक्ष धैर्यशील देसाई, जयपाल माणगावे, शंकर बिराजदार, गीतन यादव, सुधीर माळी, भीमराव पाटील, शिवाजी बीडकर, स्वप्निल श्रीधनकर यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. रामभाऊ मोहिते यांनी आभार मानले. अब्दुललाटला भेट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी अब्दुललाट ग्रामपंचायतीस भेट दिली. यावेळी सरपंच शानाबाई कोळी यांनी गावतलावाच्या सुशोभीकरणासाठी आणि अंतर्गत रस्त्यांसाठी निधीची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके, रविराज पाटील, अंकुश पाटील, रतन चौगुले, सागर सांगावे, अजित आडे, आदी उपस्थित होते.