कोल्हापूर : जम्मू-काश्मीरमधील नागरिक हे भारताचा अविभाज्य भाग आहेत. आपली सांस्कृतिक पाळेमुळे तिथून सुरू होतात. त्यामुळे त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधल्यास वर्तमानातील अनेक प्रश्न कायमस्वरूपी सुटतील, असा आशावाद जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरचे सचिव आशुतोेष भटनागर यांनी बुधवारी व्यक्त केला. येथील हिंदू व्यासपीठातर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित डॉ. के. ब. हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.भटनागर म्हणाले, जम्मू-काश्मीर म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर जे चित्र उभे राहते ते गोळीबार, आतंकवादी, सेनेची कारवाई अशाच घटनांचा समावेश त्यामध्ये असतो आणि ते चित्र श्रीनगरसारख्या एका ठराविक प्रदेशाचे असते; परंतु काश्मीरमधील अन्य जिल्ह्णांत मात्र शांतता असते. पाकव्यात काश्मीरसह एकूण २२ जिल्ह्णांचा समावेश होतो त्यातील फक्त ५ जिल्हे आतंकवादी कारवार्इंनी त्रस्त आहेत; परंतु आपल्यासमोर संपूर्ण राज्याचे चित्र असल्याचे भासविले जाते. तेथील ९३ टक्के लोक सुखा-समाधानाने आनंदी जगत आहेत. सेनेची कारवाई, दगडफेक ,अराजकता माजली आहे . तिथले नागरिकही भारतात येण्यास राजी नाहीत, त्यासाठी ते पाकिस्तानचे समर्थन करतात, असे दाखविले जाते तसेच सेना तिथल्या नागरिकांवर अत्याचार करते त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली होते, असे दाखविले जाते. हा भ्रम गेल्या सत्तर वर्षांपासून कायम ठेवण्यात काही पक्ष, त्यांची धोरणे व राजकारणी यशस्वी झाल्याने हा प्रश्न चिघळत आहे. त्यांच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधण्याची गरज आहे त्याकामी अन्य भागांतील नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा.उदय सांगवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदीप कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भटनागर म्हणाले,काश्मीर हा सीमाभाग असल्याने तिथे भारतीय सेनेचा पाहरा असणे अनिवार्यभारतासह तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तजाकिस्तान, चीन या देशांच्या सीमेमुळे काश्मीर अधिक संवेदनशीलकाश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी नवी धोरणे आखण्याची गरजसंविधानाने दिलेले अधिकार काश्मीरमधील जनतेलाही मिळायला हवेतकोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हिंदू व्यासपीठातर्फे बुधवारी आयोजित व्याख्यानमालेत आशुतोष भटनागर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून सूर्यकिरण वाघ, प्रतापसिंह दड्डीकर, उदय सांगवडेकर उपस्थित होते.
काश्मीरमधील जनतेशी संवाद व्हावा
By admin | Published: March 30, 2017 1:24 AM